वळसे पाटील, आढळरावांना शेजारी बसविले आणि एकनाथ शिंदेंनी मंचरसाठी केली मोठी घोषणा

मंचर (Manchar) ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्याचा निर्णय एकनाश शिंदे यांनी जाहीर केला.
वळसे पाटील, आढळरावांना शेजारी बसविले आणि एकनाथ शिंदेंनी मंचरसाठी केली मोठी घोषणा
Eknath Shinde with Walase and AdhalraoSarkarnama

मंचर,ता.२५ : मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या उपस्थितीत केली.

मुंबई- सह्याद्री आतिथी गृहावर झालेल्या बैठकीत शिंदे यांनी मंचर नगरपंचायतीला मंजुरी दिल्याचे जाहीर केले. मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची मागणी गेल्या दोन वर्षापासून सुरु होती. मंचर ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रुपांतर व्हावे, म्हणून गेल्या दहा महिन्यापासून विशेषतः शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयाची लढाई सुरू होती. पण गुरुवारी (ता.२५) वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्या उपस्थितीतच शिंदे यांनी मंचर नगरपंचायत मंजुरीची घोषणा केल्यामुळे मंचरकरांना दिलासा मिळाला आहे.

Eknath Shinde with Walase and Adhalrao
मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातून घेतला राज्याचा आढावा : VC द्वारे कॅबिनेटला उपस्थिती

“मंचरची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार एकवीस हजार ८४१ असून महापालिका अथवा वर्ग नगरपालिका पासून वीस किलोमीटरच्या आत मंचर ग्रामपंचायत येत नाही. तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 341 क मधील तरतुदीनुसार कृषी रोजगाराची टक्केवारी 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असणे गरजेचे असून मंचरच्या बाबतीत हे प्रमाण ५९.१५% असल्यामुळे सदर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्याचे सर्व निकष पूर्ण होत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde with Walase and Adhalrao
मंचर नगरपंचायत : ठाकरे सरकारची अधिसूचना अडकली निवडणूक आयोगाच्या कात्रीत

“मंचर नगरपंचायतीच्या मागणीसाठी दिलीप वळसे पाटील व आढळराव पाटील यांना अनेकांनी निवेदने दिली होती. मुलभूत सुविधा देणे आवश्यक होते. लोकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य कर्मचार्यांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in