'एक्सप्रेस वे' वर पोलिसांना सापडले घबाड; त्या चार कोटींचे कोल्हापूर कनेक्शन?

टीप होती `एक्सप्रेस वे`(Pune-Mumbai Expressway) वर शस्त्रात्र वाहतुकीची, मिळाले चार कोटी रुपये
Pune Police
Pune Policesarkarnama

पिंपरी : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे (Pune-Mumbai Expressway) वरून बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी तथा वाहतूक होणार असल्याची टीप पुणे ग्रामीण पोलिसांना (Pune Police) सोमवारी (ता.२८) रात्री मिळाली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा लावला. मात्र, त्यांना त्यात शस्त्रांऐवजी तब्बल चार कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड मिळाली. एवढ्या नोटा पाहून क्षणभर पोलिसही गांगरून गेले होते. याप्रकरणी सांगलीच्या दोघांना ताब्यात घेतले आहे. विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर (kolhapur by election) मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी ही रक्कम घेऊन जात असल्याचा संशय आहे.

मुंबईहून (Mumbai) पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीत (केए ५३ एमबी ८५०८) हे घबाड हाती लागले. ही सर्व रोकड पाचशे रुपयांच्या चलनी नोटांत आहे. याप्रकरणी मोटारचालक महेश नाना माने (रा. विटा, जि. सांगली) आणि त्याचा साथीदार विकास संभाजी घाडगे (रा. शेटफळ जि.सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pune Police
आता खरी रंगत येणार.. कोथरूडचे कार्यकर्ते कोल्हापूरात पोहोचले!

एवढी मोठी रक्कम कुठून कुठे व कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती. त्याबाबतचे समाधानकारक कारण हे दोघे पोलिसांना देऊ शकले नाहीत. हवालाचा हा प्रकार असण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी आयकर विभागास कळवले आहे. फौजदार सचिन बनकर, अनिल लवटे, कर्मचारी सितारमा बोकड, युवराज बनसोडे, अमित ठोसर, पुष्पा घुगे, गणेश होळकर, किशोर पवार, सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Pune Police
दोन्ही काॅंग्रेसला झोडपणाऱ्या तानाजी सावंतांची शिवसंपर्क अभियानाला मात्र दांडी!

दरम्यान, या संशयित मोटारीला थांबण्याचा इशारा करूनही ती थांबली नव्हती. म्हणून पोलिसांनी पाठलाग करून ती ताब्यात घेतली. तिची तपासणी केली असता त्यात हे घबाड सापडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com