सिद्धू मुसेवाला प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Sidhu Moosewala case| पुणे ग्रामीण पोलिसांनी १२ जून रोजी गुजरातमधील भूज जिल्ह्यातील मांडवी येथे संतोष जाधवला अटक केली.
सिद्धू मुसेवाला प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Sidhu Moosewala murder case

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रकरणातील कथित आरोपी संतोष जाधव संबंधी मोठी माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांना (Pune Police) संतोष जाधवकडून १३ पिस्तूल जप्त केले आहे. ही शस्त्रे त्याने मध्य प्रदेशातून मागवले होते. त्याच दरम्यान मुसेवाला यांची हत्या त्याच वेळी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. (Sidhu Moosewala case update)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या शस्त्रांची ब्लास्टिक चाचणी करणार आहोत जेणेकरुन यापैकी कोणत्या शस्त्रांचा वापर मुसेवाला यांच्या हत्येमध्ये झाला होता की नाही हे कळू शकेल. याशिवाय हत्येच्या वेळी संतोष तिथे नव्हता तो गुजरातमध्ये होता असा दावा करत आहे. त्याच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक गुजरातला पाठवण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी १२ जून रोजी गुजरातमधील भूज जिल्ह्यातील मांडवी येथे संतोष जाधवला अटक केली.

Sidhu Moosewala murder  case
पाथर्डीत शक्तीप्रदर्शन करत पंकजा मुंडे देणार भाजपला संदेश...

मुसेवाला हत्या प्रकरणात संशयित आणि ओंकार बाणखेले खून प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जाधवला अटक करण्यात आली होती. संतोष जाधवला आश्रय देणाऱ्या नवनाथ सुर्यवंशीच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या. पोलिसांच्या चौकशीत संतोष जाधवने त्याच्या संपर्कातील आणखी चार ते पाच जणांची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी अटक केलेले हे सर्वजण लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य आहेत. या कारवाईत त्यांच्याकडे 13 पिस्तूल आढळले.

या प्रकरणी संतोष जाधव, सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश कांबळे आणि नवनाथ सुर्यवंशी यांचे बिश्नोई टोळीशी थेट संबंध असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण, आणि अभिनेता सलमान खानला धमकी दिल्याच्या प्रकरणात त्याचा थेट सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी आरोपी संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी यांना पुणे विशेष न्यायालयाने २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मितेश घट्टे, पोलिस उपअधिक्षक सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक अशोक शेळके, सह्यायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे आदी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in