'महिलाराज' साईड पोस्टींगला, पुण्यातल्या चारही उपायुक्तांची SRPF मध्ये बदली

DCP Transfer : स्मार्तना एस. पाटील या पुण्यातील एकमेव महिला पोलिस उपायुक्त असतील.
DCP Transfer Latest News
DCP Transfer Latest NewsSarkarnama

DCP Transfer News : राज्यातील उपायुक्त दर्जाच्या पोलीस आधिकाऱ्यांच्या तीन दिवसांपूर्वी बदल्या झाल्या. बदल्यांमध्ये बहुतांश महिला अधिकाऱ्यांना साईड पाेस्टींग देण्यात आल्याचे निरीक्षण नोंदविण्यात येत आहे. पाेलीस दलात परवलीचा शब्द असलेल्या ‘पनीशमेंट पाेस्टींग’ काहीजणांना मिळाल्याचे दिसत आहे.

पोलीस दलात ‘एसआरपीएफ’ मधील पोस्टींग ही शिक्षा मानण्याची परंपरा आहे. त्यातही पुण्यातील आधिकाऱ्यांना नागपूर, चंद्रपूर, हिंगोली येथे बदलण्यात आले आहे.आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल, चंद्रपूर येथे बदली झाली आहे.नवटके यांच्या तपासामुळे ‘म्हाडा’ भरती, आरोग्य भरती पेपरफुटी, TET घोटाळा समोर येऊ शकला. अशा कार्यक्षम अधिकाऱ्याला महत्त्वाच्या जागी पोस्टिंग अपेक्षित असताना, चंद्रपूरचा रस्ता दाखविला, अशी टीका स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. (DCP Transfer Latest News)

DCP Transfer Latest News
खानाच्या कबरीवरील कारवाईचं संभाजीराजेंकडून स्वागत;आणखी दोनही गड सुचवले...

पुण्यात गेल्या दोन वर्षात महत्वाच्या पदांवर चार महिला पोलीस आधिकारी होत्या. या चारही आधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न केला.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असलेले विषय अत्यंत जबाबदारीने हाताळले. यापैकी उपायुक्त असलेल्या प्रियांका नारनवरे यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.

DCP Transfer Latest News
IPS Transfer : चोवीस तासाच्या आत तीन पोलीस अक्षीक्षकांच्या बदल्यांना स्थगिती

पाेलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनाही हिंगाेली येथे समुपदेशक राज्य राखीव पोलीस बल म्हणून पाठविण्यात आले आहे. नम्रता पाटील यांची सुरूवातीला पोलीस अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा मुंबई येथे बदली झाली हाेती. त्यानंतर पुन्हा नव्याने आदेश काढून त्यांना पुणे येथे राज्य राखीव पाेलीस बलाच्या समुपदेशक म्हणून बदलण्यात आले आहे.

दरम्यान, स्मार्तना एस. पाटील या आता पुण्यातील एकमेव महिला पोलिस उपायुक्त असतील. पिंपरी-चिंचवडच्या पाेलीस उपायुक्तपदी स्वप्ना गाेरे यांची नियुक्ती झाली आहे. राजलक्ष्मी यांना नागपूर ‘सीआयडी’तून पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे येथे बदलण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com