बारामती फत्ते करण्याच्या भाजपच्या मोहिमेत महेश लांडगेंचाही समावेश

भाजपचे (BJP) खासदार नसलेल्या बारामती, शिरूरसह राज्यातील १६ जागा २०१४ ला जिंकण्याची तयारी आतापासूनच भाजपने सुरु केली आहे.
Mahesh Landge
Mahesh Landgesarkarnama

पिंपरी : भाजपचे (BJP) खासदार नसलेल्या बारामती, शिरूरसह राज्यातील १६ जागा २०१४ ला जिंकण्याची तयारी आतापासूनच भाजपने सुरु केली आहे. त्याचा एक भाग म्हणून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या तीन दिवसांच्या बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर परवापासून (ता.२२) येत आहेत. त्यातील २२ कार्यक्रमांपैकी इंदापूर येथील युवक व नवमतदारांशी अखेरच्या दिवशी होणाऱ्या (ता.२४) सितारामन यांच्या संवादाची जबाबदारी भोसरीचे पक्षाचे तरुण आमदार महेश लांडगेंकडे (Mahesh Landge) पक्षाने सोपविली आहे.

दरम्यान, जबाबदारी सोपविलेल्या कार्यक्रमाची लांडगेंनी लगेचच आज इंदापूरला जाऊन पूर्वतयारी केली. हा संवाद होणाऱ्या स्थळाची पाहणी केली. त्यासाठी आढावा बैठक घेतली. त्याला स्थानिक पक्ष कार्यकारिणी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Mahesh Landge
गंभीर आजारातून उठताच शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा झाले आक्रमक

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत सीतारामन यांचा हा दौरा होत आहे. केंद्रीय आदीवासी राज्यमंत्री रेणूकासिंह यांनी असा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा नुकताच केला. मात्र, बारामतीची जबाबदारी शिरूरप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री नाही, तर कॅबिनेट व त्यातही अर्थसारख्या महत्वाच्या खाते असलेल्या सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यातून बारामती भाजपने किती गांभीर्याने घेतले आहे, याची कल्पना येते. दरम्यान, त्यांच्या अनेक नेत्यांनी २०२४ ला बारामतीचा गड सर करणारच असा दावा यापूर्वीच केला आहे.

सीतारामन यांचा बारामती दौरा परवापासून असला, तरी त्या उद्याच महाराष्ट्रात (पुणे) येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात मुख्यमंत्रीपदापासून सुरू झालेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीवर त्यांचे व्यवस्था परिवर्तनाची वीस वर्षे या विषयावर पुण्यात विश्वभवन, सिंबायोसिस महाविद्यालय, सेनापती बापट मार्ग येथे व्याख्यान होणार आहे. तर, परवा सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या 'बारामती' दौर्याची सुरवात पुण्यातील धनकवडीतून (खडकवासला विधानसभा मतदारसंघ) होणार आहे.

Mahesh Landge
'धनुष्यबाणा'साठी शिंदेंचा नवा डाव; ठाकरेंना धक्का बसणार?

तेथे त्या विचार परिवार समन्वय बैठक घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी (ता.२३) त्या प्रत्यक्ष बारामतीत असतील. तेथे भाजप कार्यालय व बाळासाहेब गावडेंच्या घरी भेट देणार असून त्यानंतर त्या सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्था पदाधिकारी आणि व्यापारी प्रतिनिधी संवाद साधणार आहेत. अखेरच्या म्हणजे तिसऱ्या दिवसाच्या त्यांच्या दौऱ्याची सुरवातच भोसरीचे आमदार लांडगे यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या कार्यक्रमाने इंदापूरात होणार आहे. तेथील गुरुकृपा मंगल कार्यालयात सकाळी त्या युवक आणि नवमतदारांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्याची सांगता त्या दिवशी सायंकाळी पुण्यात त्या पत्रकापरिषद घेऊन करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com