Kasba By election : धंगेकरांचा भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप; शनिवारी सकाळी उपोषणाला बसणार

Ravindra Dhangekar : कसबा पोटनिवडणुकीत वेगळा ट्विस्ट
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Kasba By-Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारतोफा आज थंडावल्या आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. असे असतानाच आज या निवडणुकीत एक वेगळा ट्विस्ट समोर आला आहे.

Ravindra Dhangekar
Kasba By-Election : रासनेंचा पराभव निश्चित : पण तो कमी मतांनी व्हावा यासाठी मुख्यमंत्री प्रचारात ; धंगेकरांचा मिश्किल टोला!

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे उद्या (दि.25 फेब्रुवारी) कसबा गणपती मंदिराबाहेर उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत भाजप नेते आणि पदाधिकारी लोकांना पैसे वाटत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. उमेदवारच उपोषणाला बसणार असल्यामुळे या पोटनिवडणुकीत वेगळा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Ravindra Dhangekar
Pune : प्रतापगडाचा प्रश्न सोडवला तसा पुण्येश्वराचाही सोडवू, त्यासाठी रासनेंना निवडून द्या; मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

''लोकशाहीची हत्या झाली आहे, त्यामुळे उद्या उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे'', असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांनी थेट मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. धंगेकर उद्या उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com