Maharashtra Police : बदल्यांतील घोळ : डीसीपींना बदलीनंतर २२ दिवसांनी मिळाली नियुक्ती

राज्यात सत्ताबदल होताच नव्या सरकारने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या केल्या.
Maharashtra Police
Maharashtra Police

Pimpri-Chinchwad IAS-IPS Transfer : राज्यात सत्ताबदल होताच नव्या सरकारने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या केल्या. पण त्यातही आयपीएसच्या बदल्यांत मोठा घोळ दिसून आला. त्यांच्या दुसऱ्या टप्याच्या या महिन्याच्या बदल्यांतील १६ एसपी तथा डीसीपींना बदलीनंतर २२ दिवसांनी काल (ता.२९) पोस्टिंग देण्यात आली.तर, तिघांच्या बदल्यांत बदल करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मतैक्याअभावी बदली झालेल्या या ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नियुक्त्या मिळण्यास मोठी दिरंगाई झाली. त्याला बदली झालेल्या व पोस्टिंग न मिळालेल्या एका आयपीएस अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला.या मतैक्याअभावीच स्पेशल आय़जी तथा अॅडिशनल डीजी लेवलच्या ३६ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची प्रमोशन आणि बदल्याही महिन्यापासून अडल्या आहेत.

Maharashtra Police
Maharashtra Politcs : ना रस्ते, ना दवाखाने; सोलापूरातील गावकऱ्यांनीच सांगितलं कर्नाटकात जाण्याचं कारण

महाविकास आघाडीचे सरकार जाऊन ३० जूनला शिंदे-फडणवीसांचे सरकार राज्यात आल्यानंतर त्यांनी सनदी आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र आरंभले. महापालिकांच्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी आपल्या सोईच्या पोलिस अधिकाऱ्यांना महत्वाच्या ठिकाणी आणले.त्याअंतर्गत त्यांनी २० ऑक्टोबरला ४३ डीसीपी तथा एसपींच्या बदल्या केल्या.पण,त्यातील १९ जणांना नवी नियुक्ती तथा पोस्टिंगच देण्यात आली नव्हती. ती १८ दिवसांनी या महिन्यात ७ तारखेला देण्यात आली. तर ४३ मधील तीन बदल्या २४ तासांतच स्थगित कराव्या लागल्या होत्या.

हे बदल्यांनंतर त्यांना स्थगिती देणे, नियुक्ती न देणे आणि नंतर त्या फिरवणे हा घोळ या महिन्यात ७ तारखेला झालेल्या ११९ एसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांतही कायम राहिला.त्यातही ९ बदल्यांना २४तासांत स्थगिती देण्यात आली,तर १० जणांना पोस्टिंगच दिली नव्हती.त्यांना आता काल २२ दिवसानंतर ती देण्यात आली.काल देण्यात आलेल्या बहूतांश पोस्टिंग या दुय्यम ठिकाणी म्हणजेच साइड पोस्टिंग आहेत.अपवाद म्हणून विजयकांत सागर यांना नागूपर,तर अजित बोऱ्हाडे यांना सोलापूर शहर,तर प्रशांत मोहिते यांना नवी मुंबई येथे डीसीपी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

कालच्याच बदली व नियुक्तीच्या आदेशात सोलापूर शहरमधील डीसीपी वैशाली कडू यांची बदली सोलापूरातच पोलिस प्रशिक्षण संस्थेचे (पीटीएस) प्राचार्य म्हणून,तर अमरावतीचे डीसीपी विक्रम साळी यांची बदली नाशिकला नागरी हक्क संरक्षणचे एसपी म्हणून करण्यात आली आहे.गृहविभागाच्या कालच्या दुसऱ्या आदेशानुसार या महिन्यात २ तारखेला बदली झालेल्या तीन डीसीपींच्या बदल्यांत दुरुस्ती म्हणजे बदल करण्यात आला आहे. त्यानुसार राज्य अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आयोग,मुंबई य़ेथे एसपी म्हणून बदली झालेल्या अर्चना पाटील यांची बदली आता अॅडिशनल एसपी, हिंगोली अशी केली गेली आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागात मुंबईत डीसीपी म्हणून बदली झालेले रत्नाकर नवले यांना,मात्र बदलीतील फेरफारानंतर पुन्हा मुंबईतच ठेवण्यात आले असले,तरी त्यांच्या नियुक्तीच्या जागेत बदल करण्यात आला आहे. त्यांना आता फोर्स वनचे अॅडिनशल एसपी करण्यात आले आहे.तर,मुंबईत दहशतवादविरोधी पथकाचे एसपी म्हणून बदली झालेले सागर कवडे हे आता वर्ध्याचे अपर पोलिस अधिक्षक (अॅडिशनल एसपी) असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com