पुण्यात सभा? हे पहिल्यांदाच ऐकतोय! अजितदादांनी ठेवले कानावर हात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
पुण्यात सभा? हे पहिल्यांदाच ऐकतोय! अजितदादांनी ठेवले कानावर हात
Ajit Pawarsarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एक मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पण त्या सभेच्या एक दिवस आधी पुण्यात महाविकास आघाडीची (MahaVikas Aghadi) सभा होणार असून सर्व बडे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची जोरदार चर्चा होती. आता या सभेबाबत उपमुख्यंमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण ही सभेला केवळ स्थानिक पातळीवरील नेतेच उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना सभेबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. इंधन दरवाढ तसेच इतर मुद्यांवर ही सभा असल्याची चर्चा होती. या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिनही पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा होती. पण या सभेला कोणताही बडा नेता उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. मुळात सभेबाबत या नेत्यांनाही माहिती नाही.

Ajit Pawar
आपण महाराष्ट्रात राहतो! अजितदादांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण

याविषयी बोलताना पवार म्हणाले, हे कुणी सांगितलं? 23 तारखेला आमची कोल्हापूरात सभा होती. पण 30 तारखेच्या सभेचं पहिल्यांदाच ऐकत आहे. महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम एक तारखेला आहे. माध्यमांमध्ये ही गोष्टी कुणी पसरवली हे मला माहिती नाही. याबाबत माझं जयंत पाटील यांच्यासोबत बोलणं झालं नाही. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्व नेते जे निर्णय घेतात, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली नाही. पण यांच्याशिवाय अन्य कोणी नेता असेल तर त्यांचं नाव सांगा. मी त्यांना विचारतो.

Ajit Pawar
पंतप्रधान मोदींना अजित पवारांनी सांगितला इंधन दरवाढीवर उपाय

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या सभेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'एक मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला 30 एप्रिल रोजी अलका चौकात महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभेचे आयोजन केले आहे. भाजप आणि मनसे वगळता ही सर्वपक्षीय सभा असेल. कालचा, आजचा आणि येणाऱ्या महाराष्ट्राचे चित्रण, महाराष्ट्राच्या प्रगतीतील योगदान आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र एकत्र ठेवण्याचा निर्धार आम्ही या सभेत केला आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.