पुण्यात मध्यवर्ती भागात बंदला प्रतिसाद : उपनगरात व्यवहार सुरळित

पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे.लक्ष्मी रस्ता, मार्केट यार्ड तसेच मध्यवर्ती भागातील सर्व बाजारपेठा बंद होत्या.
पुण्यात मध्यवर्ती भागात बंदला प्रतिसाद : उपनगरात व्यवहार सुरळित
पुणे बंद सरकारनामा

सरकारनामा ब्यूरो

पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.पुण्याच्या मध्यवर्ती भागात संपूर्ण बंद पाळण्यात आला. हॉटेल, पीएमटी, रिक्षा या सार्वजनिक सेवा पूर्णपणे बंद होत्या.उपनगरांमधील बहुतांश व्यवहार सरळित होते.मुबंई तसेच बाहेर गावावरून येणारी सर्व वाहतूक सुरळित होती.

पुणे बंद
प्रशांत जगताप म्हणाले; हा बंद निष्ठुर पंतप्रधानांच्या विरोधात.

पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे.लक्ष्मी रस्ता, मार्केट यार्ड तसेच मध्यवर्ती भागातील सर्व बाजारपेठा बंद होत्या.मार्केट यार्डमधील व्यवहार पहाटेपासून सुरू होतात.मात्र, पहाटे मार्केट यार्ड सुरू होणार नाही याची काळजी आधीच घेण्यात आली होती.मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांना बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी महासंघाने रविवारी जाहीर केला होता. त्याप्रमाणे मध्यवर्ती भागातील सर्व व्यवहार आज सकाळी बंद होते.दुपारनंतर सर्व दुकाने उघडण्यात येणार असल्याचे व्यापारी तसेच हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले.

पुणे बंद
मनसेचे अमेय खोपकर म्हणतात; सुरु राहू दे तुमचं राजकारण बंद नको चित्रीकरण !

दरम्यान, या बंदचा एक भाग म्हणून पुण्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्ष व संघटनांनी निषेध सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दुपारी बारा वाजता शहरातून बाईक रॅली काढली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.