पुणे जिल्ह्यात दुभंगलेली महाविकास आघाडी, पिंपरीत एकवटली

मूळ प्रश्न बाजूला पडतो आणि घडवून आणलेल्या वाईट घटनेवरच चर्चा सुरु होते
पुणे जिल्ह्यात दुभंगलेली महाविकास आघाडी, पिंपरीत एकवटली
Pimpri-Chinchwadsarkarnama

पिंपरी : उत्तरप्रदेशात लखीमपूर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकरी आंदोलनात मोटार घुसवल्याने आठजणांचा बळी गेला. त्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने येत्या सोमवारी (ता.११) राज्य बंदचे आवाहन केले आहे. त्यात सहभागी होऊन पिंपरी-चिंचवडकरांनी (Pimpri-Chinchwad) आपला केंद्र सरकारविरुध्दचा तीव्र निषेध नोंदवावा, असे आवाहन कॉंग्रेस, शिवसेना, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) या महाविकास आघाडीच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकारपरिषदेत शनिवारी (ता.९) केले. दरम्यान, पुणे जिल्ह्यात दुभंगलेली आघाडी (शिवसेना आणि राष्ट्रवादीत आलेला दुरावा) यानिमित्ताने पिंपरीत, मात्र एकवटल्याचे दिसून आले.

Pimpri-Chinchwad
'रावण गँग'च्या चौघांना कराडमध्ये सिनेस्टाईल पकडलं

बंदनिमित्त पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत आंदोलनही केले जाणार आहे. कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जाग यावी, यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे. तसेच पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कारखाने या दिवशी बंद ठेवावेत असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि शहर कॉंग्रेसच्या वतीने कॉंग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले. तर, लखीमपूरची घटना ही भाजपने घडवून आणली आहे, असा दावा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी केला. कारण, त्यांच्याकडे मोठे शस्त्र आहे ते म्हणजे मूळ प्रश्नांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी एखादी वाईट गोष्ट करायची.

Pimpri-Chinchwad
पवारांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाचे छापे अन् गृहमंत्री म्हणाले...

ज्यामुळे मूळ प्रश्न बाजूला पडतो आणि घडवून आणलेल्या वाईट घटनेवरच चर्चा सुरु होते. लखीमपूरच्या घडवून आणलेल्या वाईट घटनेमुळे शेतक-यांचे, कामगारांचे प्रश्न, महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न, खासगीकरण, एफडीआय हे सर्व मुळप्रश्न बाजूला पडले आहेत, असे ते म्हणाले. अदानी, अंबानींचे नेतृत्व मोदी-शहा करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना शहरप्रमख ॲड. सचिन भोसले, माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच विजय लोखंडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, फझल शेख आदी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.