राठोडांना पुन्हा मंत्रिपद मिळणार? पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचीट मिळाल्याचा महंतांचा दावा
Amitabh Guptasarkarnama

राठोडांना पुन्हा मंत्रिपद मिळणार? पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचीट मिळाल्याचा महंतांचा दावा

पोहरादेवी संस्थानच्या महंतांनी पुणे पोलिस आयुक्तांची भेट घेतली

पुणे : शिवसेनेचे (ShivSena) माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या वरील आरोपबाबत पोलीस अहवालच्या मागणीसाठी पोहरादेवी संस्थानचे 6 महंत बाबू सिंह महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जीतू महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष शंकर पवार यांनी पुणे पोलिस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आज (ता. ११) भेट घेतली.

या भेटीत पुणे पोलिस आयुक्तांनी संजय राठोड निर्दोष असल्याची माहिती दिली असल्याचा दावा महंतानी केला आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून राठोड यांना पुन्हा मंत्रीपद द्यावे, अशी मागणी सर्व महंत करणार आहेत. दरम्यान, पूजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Amitabh Gupta
महाडिकांच्या विजयाने सदाभाऊंना आमदारकीची आशा; फडणवीसांची जादू पुन्हा चालणार?

स्पोकन इंग्लिश क्लास लावण्यासाठी पूजा पुण्यात आली होती. मात्र, 7 फेब्रुवारी 2021 रोजी रात्री दीड वाजता तिने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. सुरुवातीला पूजाने आत्महत्या केल्याचे दिसत होते मात्र, या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिपमध्ये संजय राठोड आणि त्याच्या कार्यकर्त्याचे संभाषण असल्याचे बोलले गेले. या संभाषणातून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यामुळे या संजय राठोड यांच्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सुई निर्माण झाल्याने प्रकरणाला नवीन वळण लागले होते.

Amitabh Gupta
भुयार असे का वागले? याचे उत्तर अजित पवार अ्न जयंत पाटील देतील!

पूजाने आत्महत्या केली की तिची हत्या झाली? अशी चर्चा सुरू झाली. या प्रकरणावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला होता. संजय राठोड १५ दिवस नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते माध्यमासमोर आले आणि त्यांनी या प्रकरणात आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण देत विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. मात्र, विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांना पुणे पोलिसांनी क्लिनचीट दिल्याचा दावा महंतांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in