महापुरुषांची मापे काढायची आपली लायकी आहेत का; सर्वपक्षीय वाचाळवीरांना जाणकरांचा सवाल !

Mahadev Jankar : सर्वपक्षीय वाचाळवीरांची जाणकरांनी केली कानउघाडणी.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama

Mahadev Jankar : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नेत्यांकडून सतत वादग्रस्त विधान केली जात आहे. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून, विरोधक आणि सत्ताधाऱ्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर Mahadev Jankar यांनी वाचाळवीरांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे.

“महापुरुषांची मापं काढण्याची आपली लायकी नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्या तोंडावर संयम ठेवावा. आपण पब्लिक फिगर आहोत, त्यामुळे तारतम्याने वागलं पाहिजे. महापुरुषांना सन्मान देऊनच कामकाज केलं पाहिजे ”. अशा शब्दांत जानकरांनी वाचाळवीरांची कानउघाडणी केली. महादेव जानकर हे आज बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत ,यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

Mahadev Jankar
Eknath Shinde; आमचे सर्व आमदार पुन्हा निवडूण येतीलच!

काय आहे वाद ?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात झालेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यांनंतर आता छत्रपती संभाजीराजे धर्मवीर होते की स्वराज्यरक्षक, असा नवाच वाद निर्माण होताना दिसत आहे. राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार( Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांचा उल्लेख धर्मवीर असा न करता स्वराज्यरक्षक असाच करणे योग्य आहे. त्यामुळे अजित पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्यभर अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा निषेध करून निदर्शने करण्यात आली होती.

तरी देखील अजित पवार ठाम..

महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान भाजपच्या राज्यपालांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी आणि प्रवक्त्यांनी केलं आहे. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. मी आजही माझ्या विधानाशी ठाम आहे. छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेत. महापुरुषांबाबत मी कधीच बेताल वक्तव्य केली नाहीत. मी महापुरुषांचा अपमान केला असेन तर राजकारण सोडेन, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.  

Mahadev Jankar
Delhi News : महापौरपदाची निवडणूक पुढे जाणार? सभागृहात 'भाजप-आप'मध्ये गदारोळ

दरम्याम, मागील अनेक दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीच्या पद्धतीने बोलणे किंवा अपशब्द वापरला जात आहे. ही बाब सर्वच राजकीय पक्षांसाठी चिंताजनक आणि लाजिरवाणी आहे. तर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल बोलतांना तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा केवळ राजकारणाचा विषय नसून, जनतेच्या कल्याणासाठी लोकोपयोगी राज्य कारभार कसा चालवावा याचा आदर्श प्रत्येक राजकीय व्यक्तीने आपल्या डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in