Sunil Shelke News : आमदार सुनील शेळके यांच्यावरील गुन्हे मागे होण्यासाठी पोटोबा महाराजांना महाभिषेक !

Sunil Shelke Allegation in Kishor Aware : खूनाचा आरोप खोटा समर्थकांचा दावा...
Sunil Shelke News :
Sunil Shelke News :Sarkarnama

Pune News : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव मध्ये मागील दिवसात हत्या करण्यात आली होती. यानंतर आवारे यांच्या आईने तळेगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, यामध्ये त्यांनी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांचे हात असल्याचा आरोप केला होता. यामुळे या प्रकरणामध्ये आमदार शेळके यांचे नाव चर्चेत आले होते. (Latest Marathi News)

Sunil Shelke News :
Balu Dhanorkar News : खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर, उपचारांना देताहेत प्रतिसाद !

आमदार शेळकेंवर आरोप झाल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांकडून ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांना मोरया महाअभिषेक करण्यात आले होते. शेळके यांचे समर्थकांचा दावा आहे की, त्यांच्यावर खोटे आरोप झाले आहेत. समर्थकांनी या आरोपाचा खंडन करत आमदारांवर आलेलं संकट दूर करण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने काल वडगांव मावळचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज यांना मोरया महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते.

यात शेळके यांच्यावरील गुन्हे मागे होऊन त्यांच्यावरील संकट दूर व्हावे यासाठी महाअभिषेक करून पोटोबा चरणी साकडं घालण्यात आले. तसेच मावळातील राजकीय दूषित वातावरण दूर करून सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदावे ही प्रार्थना करण्यात आली.

Sunil Shelke News :
Wrestler Protest : '' ब्रिजभूषण यांच्याविरोधात FIR दाखल करण्यासाठी पोलिसांना सात दिवस लागतात,पण..''; साक्षी मलिकचं संतप्त ट्विट

काय आहे प्रकरण ?

तळेगाव दाभाडे येथे नगरपरिषद कार्यालयासमोर दि. १२ मे रोजी भर दुपारी जनसेवा विकास समितीचे प्रवर्तक किशोर गंगाराम आवारे (Kishor Gangaram Aware Killed) (वय ५०) यांची चार हल्लेखोरांनी निर्घूण हत्या केली. जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय आहे. (Pune Crime News)

या खून प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke), त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार सुनील शेळके यांनी किशोर आवारेंचा खून केल्याचा आरोप आवारेंच्या आईंने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com