महाविकास करू म्हणणारे महाभकास आघाडी सरकारच स्वप्नीलच्या आत्महत्येस जबाबदार - The Mahabhakas-led government, which wants to do Mahavikas, is responsible for Swapnil's suicide | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

महाविकास करू म्हणणारे महाभकास आघाडी सरकारच स्वप्नीलच्या आत्महत्येस जबाबदार

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 4 जुलै 2021

स्वप्नीलचे समर्पण कुठल्या ही स्थितीत व्यर्थ जाणार नाही

पुणे : राज्यातील बेरोजगार तरुण हतबल झाला आहे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे बहुतांश तरुण उच्च शिक्षित असून देखील नोकरी नसल्याने निराश आहेत. आम्ही राज्य सरकारला विविध मार्गातून वारंवार याबाबत अवगत करीत आहोत. मात्र, सरकार कुठल्या ही उपाययोजना करताना दिसत नाही. त्यामुळे स्वप्नीलसारख्या तरूणांच्या आत्महत्येस राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी केला आहे.(The Mahabhakas-led government, which wants to do Mahavikas, is responsible for Swapnil's suicide) 

अगदी काही दिवसांपूर्वी परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्ती न मिळाल्याने औरंगाबादच्या विठ्ठल भीगोट या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड जागे झाले. काल पुण्यातील फुरसुंगी इथे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने स्वतःच्या आयुष्याचा प्रवास संपवला. २०१९ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील त्याची अद्याप मुलाखत झाली नव्हती. त्याच्या आत्महत्येस पूर्णतः महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाविकास करणार म्हणणारे महाभकास राज्य सरकार जबाबदार आहे. त्यांच्या धोरणामुळे आज तरुणांना स्वतःचे आयुष्य संपवावे लागत आहे हे निंदनीय आणि खेदजनक आहे आम्ही हे खपवून घेणार नाही, असे यादव यांनी म्हटले आहे.
 

स्वप्नीलचे समर्पण कुठल्या ही स्थितीत व्यर्थ जाणार नाही आता राज्य सरकारने तातडीने उपाययोजना न केल्यास आम्ही सरकारला घाम फोडणारे आंदोलन करू आणि त्याचे परिणाम सहन होणारे नसतील, असा इशारा यादव यांनी दिला आहे.

Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख