Mahavitaran News : महावितरण अभियंत्याला तीस हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले!

Pimpri Chinchwad News : अधिक्षक (एसपी) म्हणून पदभार हाती घेताच कारवाईचा धडाका
Mahavitaran News
Mahavitaran News Sarkarnama

पिंपरीः अमोल तांबे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक (एसपी) म्हणून पदभार हाती घेताच कारवाईचा धडाकाच लावला आहे. यातही ते मोठे मासे गळाला लावत आहेत.आज (ता.२३) `महावितरण`च्या चिंचवड चाचणी विभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तथा वर्ग एक अधिकारी बाबूराव विठोबा हंकारे (वय ५१) यांना तीस हजार रुपयांची लाच घेताना, कार्यालयातच पकडण्यात आले.

Mahavitaran News
Rahul Shewale : राहुल शेवाळेंचा लेटरबाँम्ब : मनिषा कायंदेंकडून ब्लॅकमेलिंग ?

या महिन्यात ६ तारखेला मावळ तालुक्यात आढले बुद्रूक येथील तलाठी कार्यालयात वीस हजार रुपयांची लाच घेताना शिवणेच्या मंडल अधिकारी (सर्कल) संगीता राजेंद्र शेरकर (वय ५४) यांना `पुणे एसीबी`ने पकडले होते. तर, २ डिसेंबरला पुणे सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाला दीड लाखाची लाच घेताना त्यांनी अटक केली होती.तर,आजच्या कारवाईत हंकारे यांनी ३२ वर्षाच्या तरुण इलेक्ट्रीक कंत्राटदाराकडे चाळीस हजार रुपयांची लाच मागितली.

यानंतर तीस हजार रुपयांवर तडजोड करून ती चिंचवड येथील आपल्या चाचणी विभाग कार्यालयात स्वीकारली होती. कंत्राट घेतलेल्या कंपनीचे सोलर पॅनेलचे मीटर बसविण्यासाठी आवश्यक तपासणी अहवाल पाठविण्याकरिता ही लाच त्यांच्यासाठी व त्यांच्या वरिष्ठांकरिताही मागितली होती.त्यामुळे य़ा लाचखोरीत महावितरणचे आणखी वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचा संशय आहे. पण, ते कोण हे समोर येणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Mahavitaran News
Pimpri Chinchwad : 'मुख्यमंत्र्यांचे भूखंडाचे श्रीखंड बाहेर काढल्याने जयंत पाटलांवर कारवाई!'

याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास, मात्र एसीबीचे पीआय भारत साळुंखे करीत आहेत. एसपी तांबे,अॅडिशनल एसपी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in