काँग्रेसमध्ये निष्ठावंतांना न्याय मिळतो : आमदार संग्राम थोपटे

पुणे जिल्हा नियोजन समितीवर काँग्रेसच्या राहुल लेकावळे यांची निवड
Sangram Thopte
Sangram ThopteSarkarnama

नसरापूर (जि. पुणे) : काँग्रेसच्या (Congress) विचारांसह पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना पक्षाकडून नेहमी न्याय मिळतो. मोहरी येथील लेकावळे कुटुंबीयांनी कायम काँग्रेसशी बांधिलकी जपली आहे, त्यामुळेच त्यांच्या घरातील राहुल लेकावळे या तरुण नेतृत्वाला पक्षाने जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी दिली, असे प्रतिपादन भोरचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी केले. (Loyalists get justice in Congress : MLA Sangram Thopte)

आमदार संग्राम थोपटे यांच्या शिफारशीनुसार भोर तालुक्यातील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते राहुल लेकावळे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे. यानिवडीनंतर मोहरी पंचक्रोशीच्या वतीने थोपटे यांच्या हस्ते लेकावळे यांचा सत्कार करण्यात आला.

Sangram Thopte
जानकरांच्या आमदाराचा भाजपला शॉक : ‘आम्हाला गृहीत धरू नका!’

आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे मोठे पद आहे. तरुण राहुल लेकावळे यांनी या पदाचा अभ्यास करून त्या माध्यमातून गुंजन मावळ परिसराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा, असे आवाहन केले.

Sangram Thopte
मुक्कामाच्या तयारीनेच मुंबईत या : राष्ट्रवादीच्या आमदारांना निरोप!

सत्काराला उत्तर देताना राहुल लेकावळे म्हणाले की, ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या बरोबर आमच्या आजोबांनी एकनिष्ठेने काम केले, त्याचे फळ मला मिळत आहे. आमदार संग्राम थोपटे व जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे यांनी दिलेल्या या संधीचे सोने करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे करून या भागात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे.

Sangram Thopte
लग्नाला म्हणून आला अन्‌ कोर्ट परिसरात येऊन पत्नीचा काटा काढला!

या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोरचे उपसभापती रोहन बाठे, राजगडचे संचालक शिवाजीराव कोंडे, महेश टापरे यांनीही भाषणातून लेकावळे यांना कामासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास मुंबई बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, सुधीर खोपडे, सोमनाथ वचकल, पोपट सुके, तांभाडचे सरपंच अमोल शिळीमकर, वेळूचे सरपंच अमोल पांगारे, ज्ञानेश्वर पांगारे, मोहरीचे सरपंच दत्तात्रेय बिरामणे, उपसरपंच शोभा राजगुरु, सागर लेकावळे, दत्तात्रय बिरामणे, रामदास खोपडे, ज्ञानेश्वर झोरे, इरफान मुलाणी, सोमनाथ निगडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com