ग्रामपंचायत निवडणूक : राज्यात 79 टक्के; जिल्ह्यात 80 टक्के मतदान

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील अंतीम आकडेवारी हाती आली असून 80.54 टक्के मतदान झाले आहे.
sar22.jpg
sar22.jpg

पुणे : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील अंतीम आकडेवारी हाती आली असून 80.54 टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली. यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे आज प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होईल.

आज मतदान झालेल्या ग्रामपंचायतींच्या 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी एकूण 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननी आणि माघारीनंतर 2 लाख 41 हजार 598 उमेदवार शिल्लक होते. त्यापैकी 26 हजार 718 उमेदवार बिनिविरोध विजयी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अंतिमत: 2 लाख 14 हजार 880 उमेदवार आज प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात होते.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी झालेल्या मतदानाची प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय संख्या : ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.

अशी आहे आकडेवारी
निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी
वेल्हे : 86 09
भोर : 85.53
दौंड : 79.30
पुरंदर : 82.95
इंदापूरर : 81.92
बारामती : 84.64
जुन्नर : 76.55
आंबेगाव : 76.91
खेड : 82.04
शिरूर : 82.77
मावळ : 81.76
मुळशी :76.27
हवेली : 73.98

--
Edited By : Umesh ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com