स्मृती इराणींप्रमाणे चंद्रकांतदादाही पक्ष सांगेल तेथून निवडणूक लढवतात : बापटांनी काढला चिमटा

देशाच्या कुठल्याही मतदारसंघात त्यांना उभं करा. त्या बोलत नाहीत, त्यांचं काम बोलतं; म्हणूनच राहुल गांधी यांना अमेठीत पराभूत करण्याचा विक्रम त्यांनी केला.
Smriti Irani-Chandrakant patil
Smriti Irani-Chandrakant patil Sarkarnama

पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचे एक वैशिष्ट्ये आहे की, त्या भारतीय जनता पक्ष सांगेल त्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवतात. चंद्रकांतदादा तुम्हीसुद्धा तसेच आहात, तुम्हीही पक्ष सांगेल तशी निवडणूक लढवता, अशा शब्दांत पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांना पुणेरी चिमटा काढला. (Like Smriti Irani, Chandrakantdada also contests from wherever the party says : Girish Bapat)

अमित शहा आणि भाजपची वाटचाल या मराठीतील अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी बापट बोलत होते.

Smriti Irani-Chandrakant patil
राष्ट्रपती राजवटीसाठी आता सदाभाऊंची संघटना मैदानात : केंद्राला पाठविणार ५ लाख पत्र!

खासदार बापट म्हणाले की, मी आमदार असताना स्मृती इराणी मुंबईत कायम भेटायच्या. आता त्या केंद्रीय मंत्री असल्याने संपूर्ण देशभर त्यांचा संचार असतो. महिला, बालकांच्या अनेक योजनांचे नियोजन करून त्यांनी त्या राबविल्या आहेत. पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मात्र त्यांचा मतदारसंघच बदलून टाकला. पार्लमेंट बोर्ड बसायचं आहे, तुम्हाला पार्लमेंट बोर्डात पाठवावंच लागणार. त्याशिवाय स्मृती इराणींना तिकिटच मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी मुळीक यांना लगावला.

Smriti Irani-Chandrakant patil
शेकापशी ३२ वर्षे एकनिष्ठ असणाऱ्या अख्ख्या गावाने केला शिवसेनेत प्रवेश

देशाच्या कुठल्याही मतदारसंघात त्यांना उभं करा. त्या बोलत नाहीत, त्यांचं काम बोलतं; म्हणूनच राहुल गांधी यांना अमेठीत पराभूत करण्याचा विक्रम त्यांनी केला. पुणेरी लोक कसं असतात, याचा अनुभवही तुम्हाला निर्दशनामुळे आला असेल. आवाज उंदराएवढा आणि दाखवतात विमानाएवढा. चिमणी विझताना मोठी होऊन विझते, त्यामुळे पुढच्या काळात अनेक चिमण्या विझणार आहेत. ज्या विझणार नाहीत, त्यांना आपल्याला विझवावं लागेल. त्याची पहिली फुंकर तुम्ही आज मारली आहे. मी भाग्यवान आहे की लोकसभेत स्मृती इराणी यांचं काम बघता येतं, असे बापट यांनी नमूद केलं.

अमित शहांची पुस्तके विकणार

मी पीडीला नापास झाल्यानंतर सहा महिने नोकरी करण्याचे ठरविले होते. छोटे छोटे उद्योग करायचे. तेव्हा ताडपत्रीच्या एका पिशवीत पुस्तके घेऊन पुणे शहरात विकायचो. तोच रोल आम्ही आता करणार आहोत, अमित शहांची पुस्तके आम्ही शहरात विकणार आहोत, असे गिरीश बापट यांनी सांगितले.

बापट म्हणाले की, अमित शहा यांचे प्रत्येक बारीक बारीक गोष्टींत लक्ष असते. चेहऱ्यावरची रेषाही न हलू देता निर्णय प्रक्रिया प्रचंड वेगवान पद्धतीने राबतात. लोकसभेतील ३७० कलमावरील अमित शहा यांचे अजरामर भाषण आहे. असुद्दीन ओवैसीला त्यांनी ठणकावून सांगितले की आम्ही काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले आहे. आम्ही तेवढ्यावरच थांबणार नाही, तर त्याही पुढचे पाऊल टाकणार आहोत. गृहमंत्रीपदासारख्या मोठ्या पदावर असूनही ते छोट्या कार्यकर्त्यालाही ते विसरत नाहीत. त्यांचा आवाका मोठा आहे. आपल्या पक्षाचे सभासद कसेबसे एक कोटीवर पोचायचो. अमित शहांनी १८ कोटी सभासद संख्या नेऊन ठेवली आहे. आपल्याला सर्वकाही हवं असतं पण कष्ट नको असतात. देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र अमित शहा यांनी प्रवास केला आहे. छोट्या छोट्या गोष्टींचे ते नियेाजन करतात. जनसंघ गेला भाजप काय करणार, असे विचारणाऱ्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी सडतोड उत्तर दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com