तृतीयपंथीयांना महापालिकेकडून मिळणार पेन्शन अन् सुरक्षारक्षक म्हणून संधी

तृतीयपंथीयांना बऱ्याचदा उतारवयात हलाखीचे जीवन जगावे लागते.
LGBT Community
LGBT CommunitySarkarnama

पिंपरी : दुर्लक्षित तृतीयपंथीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) दरमहा पेन्शन (Pension) देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना सुरु करणारी पिंपरी ही देशातील पहिली पालिका ठरली आहे. या दुर्लक्षित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक क्रांतीचे हे दमदार पाऊल उचलले असल्याचे पालिकेच्या वतीने मंगळवारी (ता. १० मे) सांगण्यात आले. (LGBT Community will get pension from Pimpri Municipal Corporation)

LGBT Community
लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा; आठवडाभरात मिळू शकतो डिस्चार्ज

वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या पालिका हद्दीतील तृतीयपंथीयांना आर्थिक मदत म्हणून दरमहा ३ हजार रुपये पेन्शन दिली जाणार आहे. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी त्यांच्या जीवनावर दुरगामी सकारात्मक परिणाम करणारी ही पेन्शन योजना असल्याचे पालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले. तृतीयपंथी घटक हा ब-यापैकी समाजावर अवलंबून असतो. अशावेळी समाजाने त्यांच्या संवेदना जाणून घेतल्या पाहिजेत. आपले कर्तव्य म्हणून प्रत्येकाने उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांप्रती सामाजिक जाणिवेतून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पालिका या कल्याणकारी कामासाठी पुढाकार घेत असून या समूहाला मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम आणि योजना हाती घेतल्या आहेत. तृतीयपंथीयांना ब-याचदा उतारवयात हलाखीचे जीवन जगावे लागते. अशावेळी त्यांना आर्थिकदृष्टया मदत करुन त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी पालिकेने महत्वाकांक्षी आणि वास्तववादी अशी ही पेन्शन सुरु केली आहे, असे आयु्क्त पाटील म्हणाले.

LGBT Community
संभाजीराजेंचे काय करायचं; शरद पवारांनी टाकली गुगली...

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालिकेने या समूहाला नुकतीच मेट्रोची मोफत सफर घडवून आणली होती. सार्वजनिक वाहतुकीच्या वापरामध्ये या घटकाने सहभाग घ्यावा हा यामागील उद्देश होता. याशिवाय पालिकेच्या ग्रीन मार्शल पथकामध्ये तृतीयपंथीयांची नेमणूक देखील केली जाणार असून स्वच्छाग्रह अभियानात त्यांचा सहभाग वाढविला जाणार आहे. तसेच त्यांना पालिकेच्या विविध उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकाची जबाबदारी दिली जाणार आहे. महापालिका हद्दीतील तृतीयपंथी व्यक्तींच्या बचतगटांना व्यवस्थापन आणि बळकटीकरणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना देखील आता नव्याने सुरु करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com