चर्चा काहीही होऊ दे; पुण्याची जागा कॉंग्रेस सोडणार नाही

पुण्याच्या जागेवर कायमस्वरूपी कॉंग्रेसचाच हक्क असली तरी काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारची चर्चा घडवून आणत आहेत
bagve.jpg
bagve.jpg

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघ हा कायमस्वरूपी कॉंग्रेसचा हक्काचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याचा प्रयत्न कुणीही करीत नाही. मला पाठविलेले पत्र हा पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. मात्र, हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहणार आहे याबाबत कुणीही शंका बाळगू नये, असा विश्‍वास कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे (Ramesh Bagve) यांनी आज व्यक्त केला.(Let the discussion be anything; Congress will not leave Pune seat for Loksabha) 

पक्षाच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने पक्षातील अन्य ज्येष्ठ पदाधिकाऱ्याबाबत तक्रार करणारे पत्र गेल्या आठवड्यात शहराध्यक्ष बागवे यांना दिले होते.राज्य पातळीवर काम करणारा हा नेता पक्षातील अंतर्गत बाबी भारतीय जनता पार्टीला पुरवत असल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला होता. या पत्राबाबत अधिक बोलण्याचे शहराध्यक्ष बागवे यांनी टाळले.बागवे म्हणाले, ‘‘ बूथ कमिट्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मी बैठक बोलावली होती. मात्र, मी आजारी पडल्याने अन्य पदाधिकाऱ्यांनी ती बैठक घेतली.त्यामुळे त्यात आक्षेपार्ह काहीच नाही.पत्रातला मजूकर आणि करण्यात आलेल्या तक्रारी हा पक्षाच्या संघटनेतील अंतर्गत भाग आहे.’’

चर्चा काहीही होत असली तरी पुण्याची जागा ही पूर्वीपासून कॉंग्रेसची आहे. काही अपवाद वगळता स्वातंत्र्यानंतर प्रत्येक निवडणुकीत पुण्यात कॉंग्रेसचाच खासदार निवडून आले आहेत.बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळांपासून सुरेश कलमांडी यांच्यापर्यंतची ही मोठी परंपरा आहे. पक्षाची संघटना आणि कॉंग्रेसला मानणारा परंपरागत मतदार पुण्यात आहे. त्यामुळे पुण्याची जागा अन्य मित्र पक्षांना देण्याचा प्रश्‍नच येत नाही, असे बागवे यांनी सांगितले. 

पुण्याच्या जागेवर कायमस्वरूपी कॉंग्रेसचाच हक्क असली तरी काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारची चर्चा घडवून आणत आहेत.मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम्ही पुण्याची जागा सोडणार नाही, असे बागवे यांनी स्पष्ट केले. 

 मुळात लोकसभा निवडणुकीला अद्याप अडीच वर्षांचा कालावधी आहे.सहा महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आमच्यापुढे आता महापालिका निवडणूक महत्वाची आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला खाली खेचून कॉंग्रेसची सत्ता आणणे हे आमचे ध्येय आहे, असल्याचे बागवे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com