पुण्यात माननीयांच्या ‘चमकोगिरी’ला रहिवाशांनी शिकवला धडा !

नावाचा फलक पाहून सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमचे सदस्य संतप्त झाले.
PMC
PMC Sarkarnama

पुणे : पैसा करदात्यांचा, उभारणी पुणे महापालिकेची (PMC) आणि विकास कामांना नाव मात्र, नगरसेवकांच्या कुटुंबियांचे !, या मानसकितेच्या विरोधात सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमचे सदस्य रस्त्यावर उतरले आणि रविवारी सकाळी आंदोलन केले. सॅलिसबरी पार्कमधील उद्यानाचे नाव महापालिका बदलत नाही, तो पर्यंत आंदोलन करण्याचा निर्धारही तेथील रहिवाशांनी केला आहे.

PMC
सोमय्यांनी दिलेल्या आव्हानाला वळसे पाटलांनी दिलं असं उत्तर...

सॅलिसबरी पार्कमध्ये पुनावाला उद्यानाच्या शेजारी उद्यान उभारले आहे. त्याचे गेल्यावर्षी ऑक्टोंबरमध्ये उदघाटन झाले. त्यावेळी फोरमच्या सदस्यांनी या उद्यानाला कोणाचेही नाव देऊ नये, अशी मागणी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्याकडे केली. त्यानुसार उद्यानाला ‘पुणे महापालिका उद्यान’ असे नाव देण्यात आले होते. त्याचा फलकही बसविण्यात आला होता. परंतु, १३ मार्च रोजी रात्री अचानक उद्यानाच्या प्रवेशद्वारावर ‘यशवंतराव भिमाले उद्यान’ या नावाचा फलक बसविण्यात आला.

PMC
गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांना पोलिसांनी अडवले; रस्त्यावरच मांडला ठिय्या

नावाचा फलक पाहून सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमचे सदस्य संतप्त झाले. या बाबत परिसरातील नागरिकांनी व्हॉटसअप, फेसबुकवरून जागरूकता निर्माण केली. रविवारी सकाळी १० ते ११. ३० दरम्यान फोरमचे सुमारे १०० सदस्य आणि परिसरातील रहिवासी तेथे एकत्र आले. महापालिकेच्या उद्यानाला व्यक्तिगत नाव देऊ नये, या मागणीसाठी त्यांनी सुमारे दीड तास आंदोलन केले. त्यात फोरमचे अध्यक्ष फैजल पुनावाला तसेच विनिता देशमुख, मीरा सोसायटीचे अध्यक्ष गोपालस्वामी भास्कर, वृंदावन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश धोका, परिसरातील रहिवासी बाळासाहेब रूणवाल आदींच्या नेतृत्त्वाखाली रहिवाशांनी आंदोलनात भाग घेतला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडेही रहिवाशांनी तक्रार केली आहे.

PMC
राज्यातील नेत्यांचे दाऊदशी संबध; अरुण गवळींच्या पत्नीचा गौप्यस्फोट

सॅलिसबरी पार्क शेजारी पुनावाला उद्यान आहे. त्या शेजारी महापालिकेचा भूखंड आहे. त्यावर उद्यानाचे आरक्षण होते. परंतु, त्यात बदल करून तो बांधकाम व्यावसायिकाला महापालिकेने दिला. त्याच्या विरोधात सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरम तसेच परिसरातील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली. हा लढा सर्वोच्च न्यायालयात पोचला. अखेर २० वर्षांनी न्यायालयाने आदेश दिला. त्यानुसार भूखंड मालकाला १८ कोटी रुपयांची महापालिकेने नुकसान भरपाई दिली आणि भूखंडा उद्यानासाठीच आरक्षित ठेवला. उद्योजक सायरस पुनावाला यांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून (सीएसआर) उद्यान उभारून देण्याची तयारी दर्शविली. परंतु, महापालिकेने त्यास नकार दिला. उभारलेल्या उद्यानाचे गेल्यावर्षी २५ नोव्हेंबर रोजी उदघाटन झाले. त्यावेळी ‘पुणे महापालिका उद्यान’ असे नाव देण्यात आले. परंतु, महापालिकेवर प्रशासक नियुक्त होण्याच्या आदल्या दिवशी १३ मार्च रोजी उद्यानाचे नाव बदलून ‘यशवंतराव भिमाले उद्यान’, असे नाव देण्यात आले.

PMC
राजस्थानमधील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया सभागृहात जेव्हा रडू लागतात...

नगरसेवक भिमालेंचा दावा

उद्यानासाठी भूखंड मिळावा म्हणून २००७ पासून नागरिकांच्या सहकार्याने मी लढा दिला आहे. त्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातही गेलो होतो. २०१७ मध्ये जागा मिळविली. महापालिकेमार्फत ३ कोटी रुपये खर्च करून उद्यानाची निर्मिती केली. यशवंत भिमाले यांचे नाव देण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमार्फत अधिकृत ठराव करून त्यांचे नाव देण्यात आले आहे. नावाची लढाई करण्यापेक्षा नागरिकांनी उद्यानाचा वापर करावा. आंदोलकांमध्ये काही राजकीय कार्यकर्तेही आहेत.

उद्यानाला कोणाचेही वैयक्तिक नाव नको, अशी सॅलिसबरी पार्कमधील रहिवाशांची भावना आहे असे, सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमच्या विनिता देशमुख यांनी सांगितले. पुणे महापालिका उद्यान, हे नाव बदलण्याची गरजच काय आहे ? प्रभागातील काही विकास कामांनाही नगरसेवकांनी त्यांच्या कुटुंबियांची नावे या पूर्वीच दिली आहे. लोकभावनेची भिमाले यांनी दखल घ्यावी, एवढंच आमचं म्हणणं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com