Dhananjay Alhat
Dhananjay AlhatSarkarnama

पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला घरचा आहेर

विजेच्या लपंडावाच्या निषेधार्थ राज्य सरकारमधील दोन पक्षांचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी मोशी-चिखलीच्या महावितरण कार्यालयावर कंदील मोर्चा काढला.

पिंपरी : राज्यात शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांची सत्ता आहे. सरकारमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत ऊर्जामंत्री (Nitin Raut) आहेत. त्यामुळे वीज प्रश्नासंदर्भात विरोधी पक्ष भाजपने मोर्चा काढला असता, तर समजू शकलो असतो. मात्र, तो शिवसेना आणि राष्ट्रवादीने काढत एकप्रकारे महाविकास आघाडीला घरचा आहेर दिला आहे.

बांधीलकी आमची जनतेशी म्हणत, त्यांनी महावितरणच्या (MSCB) कार्यालयावर सोमवारी (ता.४ऑक्टोबर) कंदील मोर्चा काढल्याने त्याची चर्चा झाली. हे आयते कोलीतच भाजपच्या (BJP) हाती लागल्याने. पिंपरी-चिंचवड (Pipri-Chinchwad) भाजपने संधी साधत सत्तेतील लोकांनीच सरकारच्या महावितरण वीज कंपनी विरोधात मोर्चा काढून राज्य सरकार निष्क्रिय असल्याची ही कबुली दिली असल्याची टीका भाजपचे शहरातील मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे.

Dhananjay Alhat
वाकडमध्ये पुन्हा झळकले फ्लेक्स : होय, मी रस्ता बोलतोय !

या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे भोसरी विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक धनजंय आल्हाट व राष्ट्रवादीचे नगरसेवक व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. शहरातील जाधववाडी, डुडूळगाव परिसरातील विजेच्या लपंडावाच्या निषेधार्थ हा कंदील मोर्चा राज्य सरकारमधील दोन पक्षांचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी मोशी-चिखलीच्या महावितरण कार्यालयावर काढला. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात वीजेचा लंपडाव सुरू असल्याने स्थानिक प्रचंड हैराण आहेत. म्हणून महावितरणच्या या गलथान कारभाराला वैतागून हा मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मोशीतील देहूरस्त्यापासून मोर्चाला सुरूवात झाली तर, रिव्हर रेसिडेन्सी सोसायटी समोरील महावितण कार्यालय येथे संपला. माजी नगरसेवक अरूण बोऱ्हाडे, मंदा आल्हाट, योगेश बोराटे, संजय लडकत, विकास साने, आतिश बारणे, नितीन सस्ते, राहुल बनकर, केदार गव्हाणे, मयूर कुदळे आदींनी मोर्चात सहभाग घेतला. वीज अनियमिततेमुळे मोशी, जाधववाडी, डुडूळगाव परीसरातील नागरिक, व्यावसायिक, लघुउद्योग यांना होणारा त्रास व अडचणीचा जाब धनजंय आल्हाट यांनी यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना विचारला. नगरसेवक अजित गव्हाणे यांनीही वीजवितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला.

Dhananjay Alhat
हेवेदावे बाजूला ठेवून काम केल्याने, मावळ तालुका कोरोनामुक्तीकडे...

महावितरणचे उप अभियंता व कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देऊन लवकरात लवकर या भागातील वीज पुरवठा नियमित होण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशन उभारावे अशी मागणी करण्यात आली. सबस्टेशनसाठी जागा व इतर अडचणींवर येत्या आठवड्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न लवकर मार्गी लावला जाईल, असे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, महापालिका निवडणूक चार महिन्यांवर आल्याने या निवडणुकीतील आघाडीच्या इच्छूकांनी हा मोर्चा काढल्याची टीका भाजपने केली. निवडणुकीच्या निमित्ताने का होईना आघाडी सरकार निष्क्रीय असल्याची कबूली त्यांनी स्वत:च दिली आहे. हा त्याचा पुरावा आहे. यातच पिंपरी-चिंचवडकरांचे हित आहे. "धन्यवाद महाविकास आघाडी पिंपरी-चिंचवड शहर" असा टोला लगावत, राज्य सरकारकडे याप्रश्नी दाद मागण्याऐवजी मोर्चा काढून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी स्टंटबाजी केली असल्याची टीका भाजपचे थोरात यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com