फडणवीस, मुंडेंच्या त्या पत्राने पिंपरीतील रिक्षाचालकाचा नेता बनला ‘आमदार’

क्षणभर आमदार झाल्याचा भास व आनंदही झाला होता.
फडणवीस, मुंडेंच्या त्या पत्राने पिंपरीतील रिक्षाचालकाचा नेता बनला ‘आमदार’
Aziz SheikhSarkarnama

पिंपरी : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्य नियुक्तीचा तिढा गेले वर्षभर कायम आहे. त्यातून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात तू, तू, मैं, मैं सुरु आहे. हा वाद सुटला नसताना रिपब्लिकन पक्षाच्या वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिज शेख (वय ४३, रा. खराळवाडी, पिंपरी) यांना न मागताच विधान परिषदेवर गेल्या महिन्याच्या शेवटास संधी मिळाली. तसे पत्रच राज्यपाल कोश्यारी यांच्या लेटरहेडवर त्यांच्या सहीनिशी शेख यांच्या व्हाटस अपवर पाठविण्यात आले. त्यामुळे क्षणभर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण, हे पत्र बोगस  असल्याचा संशय आला. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी लावलेल्या चौकशीत ते बनावट निघाले, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या या प्रदेश पदाधिकाऱ्याला आमदारकीपासून वंचित रहावे लागले. (Leader of rickshaw Driver's was made MLA through fake letter from Governor)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या पत्रांमुळे आपल्याला विधान परिषदेवर घेतल्याचा उल्लेख राज्यपाल कोश्यारींचे बनावट नाव, सही व लेटरहेडचा वापर करून तयार करण्यात आलेल्या व शेख यांना पाठविण्यात आलेल्या या पत्रात आहे. शेख हे रिक्षाचालकांचे शहरातील नेतेही आहेत, त्यांच्याकडे बदली वाहनचालक म्हणून काम करणारा प्रमोद ठोंबरे (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, पिंपरी-चिंचवड) याचा हा प्रताप असल्याचे शेख यांनीच शोधून काढले. दरम्यान, मुंबईला गेलेल्या ठोंबरे याला त्यांनी विश्वासाने पुन्हा बोलावून पोलिसांच्या हवाली केले. मात्र, या बनावट दस्त बनविण्याच्या या बोगसगिरीच्या गुन्ह्यात त्याला अद्याप अटक केली नसल्याचे पिंपरी पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

 Aziz Sheikh
महेश कोठेंनी अवलंबले पवारांचे धक्कातंत्र : चंदेले, खरटमलनंतर बेरियाही राष्ट्रवादीच्या वाटेवर

पिंपरी-चिंचवडमधील विधानसभेच्या तीनपैकी पिंपरी हा राखीव मतदारसंघ आहे. तेथून आपली नेमणूक झाल्याचे या २५ सप्टेंबरच्या या बोगस पत्रात नमूद करण्यात आले होते. तेथेच शेख यांना शंका आली. विधानसभेच्या जागेवर विधान परिषदेसाठी नियुक्ती होईलच कशी, अशी त्यांना शंका आली. म्हणून ते तडक पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे गेले अन ही बनावटगिरी समोर आली.

दुसरं म्हणजे असे दुसरे बनावट पत्र २८ सप्टेंबरला राज्यपालांच्या नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून देण्यात आले. त्याचीही प्रत शेख यांना पाठवण्यात आली होती. मुंबईतील भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखळकर तसेच राज्यातील अभिमन्यू पवार, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, गिरीश महाजन, नारायण कुचे, राम सातपुते तसेच हरीश पिंपळे आणि किर्तीकुमार भांगडिया या विधानसभा आमदारांच्या ११ जणांच्या निवड यादीत अजिज नबाब शेख यांचे नाव सातव्या क्रमांकावर आहे. आपण न मागताही विधान परिषदेवर आपल्याला संधी दिली जाईलच कशी, असा पहिला प्रश्न या पत्रानंतर डोक्यात उभा राहिला. तसेच, दुसऱ्या पत्रात विधानसभा आमदारांच्या यादीत आपले नाव दिसले. तेथेच शंकेची पाल चुकचुकली, असे शेख यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

 Aziz Sheikh
अजित पवारांच्या कारखान्यांवरील छापेमारीमागेचे खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीस!

काही का होईना क्षणभर आमदार झाल्याचा भास व आनंदही झाला होता, हेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले. तसेच, हा उद्योग ठोंबरे याने कशासाठी केला असावा, हे समजले नाही, असे त्यांनी सांगितले. कारण, त्यासाठी त्याने आपल्याकडे पैशाची मागणी केली नव्हती, हे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आता पोलिस चौकशीतच कशातून हा प्रकार घडला वा केला हे निष्पन्न होणार आहे.

Related Stories

No stories found.