लोणावळ्यात पोलिसांच्या मध्यस्थाला दीड लाख रुपयांची लाच घेताना अटक; PI फरार

सहाय्यक फौजदारला ताब्यात घेण्यात आले आहे.
Bribe
Bribe Sarkarnama

पिंपरी : मागील काही दिवसांपासून सातत्याने पोलिसांच्या लाचखोरीची प्रकरण समोर येत असताना आता लोणावळ्यात पोलिसांच्या मध्यस्थाला लाच स्विकारताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी या मध्यस्थासह एक सहाय्यक फौजदार आणि एका पोलिस निरीक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदारला ताब्यात घेण्यात आले आहे. तर पोलिस निरीक्षक फरार झाले आहेत. (Pune crime news)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे ग्रामीणमधील लोणावळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तथा पीआय प्रवीण बाळासाहेब मोरे (वय ५०) एएसआय कुतुबुद्दीन गुलाब खान (वय ५२) यांच्यासाठी दीड लाखाची लाच घेताना त्यांचा मध्यस्थ यासीन कासम शेख (वय ५८) याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. काल रात्री पुणे-मुंबई महामार्गावरील करिश्मा ढाब्यावर ही कारवाई करण्यात आली. (Crime news latest)

Bribe
केतकी चितळे विरोधात कळव्यात पहिला गुन्हा दाखल; पोलिस आजच ताब्यात घेण्याची शक्यता

त्यानंतर आज एएसआय खान यालाही अटक करण्यात आली. मात्र, मोरे हाती लागलेले नाहीत. ३९ वर्षीय तरुणाच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी त्याच्याकडे दोन लाख रुपयांची लाच मागण्यात आली. नंतर दीड लाखावर तडजोड झाली होती. पुणे एसीबी युनिटच्या डीवायएसपी विजयमाला पवार, पीआय प्रवीण निंबाळकर, एएसआय मुश्ताक खान यांनी रचलेल्या सापळ्यात शेख अडकला.

Bribe
केतकी चितळेविरोधात दुसरा गुन्हा पुण्यात! कारवाई अटळ असल्याचे गृहमंंत्र्यांचे विधान

काही दिवसांपूर्वीच मावळमध्ये एक पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांनाच लाच स्विकारताना अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com