'उपरा'कार संतापले, विक्रम गोखलेंनी आठ दिवसात माफी मागावी, अन्यथा..

तिघांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे लक्ष्मण माने (Laxman Mane) म्हणाले.
'उपरा'कार संतापले, विक्रम गोखलेंनी आठ दिवसात माफी मागावी, अन्यथा..
Vikram Gokhale & Laxman ManeSarkarnama

पुणे : अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतांना देशाला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर तिच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली आहे. मात्र, दरम्यान या वक्तव्याचे समर्थन मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंनी (Vikram Gokhale) केले. यानंतर गायक अवधूत गुप्ते (Avdut Gupte) यांनी देखील गोखले हे अभ्यासपूर्वक बोलतात म्हणत अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला.

याबाबत आज (ता 19 नोव्हेंबर) पुण्यात 'उपरा'कार लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी पत्रकार परिषद घेऊन तिघांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. तसेच, येत्या 27 नोव्हेंबरपर्यंत या तिघांनी देशातील जनतेची माफी मागावी, अन्यथा विक्रम गोखलेंच्या घराबाहेर महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्यासारखा सत्याग्रह करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Vikram Gokhale & Laxman Mane
केंद्र सरकार व भाजपने देशाची माफी मागावी

लक्ष्मण माने म्हणाले, "अभिनेत्री कंगना राणावतने पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यानंतर या विधानाचे गोखले आणि गुप्ते यांनी समर्थन केले आहे. या तिघांचा मी निषेध व्यक्त करतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जे शहीद झाले त्या सर्वांचा या तिघांनी अपमान केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच, तातडीने त्यांच्याबर कारवाई झाली पाहिजे. याविरोधात मी पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे." असे त्यांनी सांगितले.

Vikram Gokhale & Laxman Mane
मलिक निघाले थेट दुबईला! केंद्रीय तपास यंत्रणांना दिलं खुलं आव्हान

मी आंबेडकरवादी मात्र, महात्मा गांधी, सावरकर, लोकमान्य टिळकांच्या योगदानाचा आदर

मी आंबेडकरवादी असून मला महात्मा गांधी, सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे विचार पटत नाही. मात्र, त्यांचे देशाच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्यावर कोणीही बोलणार असेल तर, मी सहन करणार नाही. असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच, आज जे लोक स्वातंत्र्याबद्दल बोलत आहे त्या लोकांचे देशासाठी काय योगदान आहे? असा सवाल विचारत तिघांपैकी एकाने पुढे येऊन या प्रश्नाचं उत्तर द्यावे, असे आव्हानही माने यांनी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in