लक्ष्मण जगताप म्हणाले, मला पक्षादेश पाळाचायं : कुटुंबियांकडून मुंबईला नेण्याची तयारी सुरु

Laxman Jagtap | BJP : भाऊंचा हट्ट पुरवायचा निर्णय कुटुंबियांनी घेतलायं.
Laxman Jagtap News in Marathi, Pune News, Rajya Sabha Election 2022 News
Laxman Jagtap News in Marathi, Pune News, Rajya Sabha Election 2022 NewsSarkarnama

पिंपरी : आजारापणामुळे बेडवर असूनही, 'भाऊं'ना अर्थात भाजपचे (BJP) आमदार लक्ष्मण जगतापांना (Laxman Jagtap) मुंबईत बोलावलं जातयं. त्यांच्या प्रवासासाठी पक्षाने चक्क एअर अॅब्युलन्सचीही सोय केलीय. एवढेच नाही या अॅम्बुलन्समध्ये खास उपचार व्यवस्थेची सोय आहे. पण या अवस्थेत 'भाऊं'ना घराबाहेर काढायला कुटुंबियांचं धाडस होईना. पण पक्षाचा आदेश आहे आणि तो मला पाळायचायं, असा हट्ट करुन स्वतः भाऊ मुंबईत मतदानासाठी जायचं यावर ठाम आहेत आणि भाऊंचा हा हट्ट पुरवायचा निर्णय कुटुंबियांनी घेतलायं. त्यामुळे भाऊ उद्या मतदानासाठी मुंबईत मतदानासाठी दाखल होणार आहेत. (Laxman Jagtap News in Marathi)

राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election) रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलीय. मुंबईत उद्या (गुरुवार) विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात ६ जागांसाठी मतदान होणार आहे. विजयासाठी भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूला अगदी एक-एक मत महत्वाचं बनलयं. सोबत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या हातात विजयाची चावी आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी मतांची बेरीज केली जातीयं. (Rajya Sabha Election Latest News)

अशा स्थितीमध्ये भाजपकडूनही आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतासाठी आग्रह धरला जातोय. मात्र 'भाऊं'ना मागील काही काळापासून गंभीर आजाराने ग्रासले आहे. नुकतेच तब्बल ५० दिवसांच्या उपचारानंतर त्यांना पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलायं. यापूर्वी ते अमेरिकेतही उपचार घेऊन आले होते. त्यानंतरही त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १२ एप्रिल रोजी ज्यूपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना व्हेंटीलेटर देखील लावण्यात आला होता. या दरम्यान, अमेरिकेहून मागविलेल्या सुमारे एक लाख रुपयांच्या इंजेक्शनमुळे त्यांच्या प्रकृती कमालीची सुधारणा झाली आहे. (Rajya Sabha Election Latest News)

अशा गंभीर आरोग्य स्थितीमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या प्रवासासाठी एअर अॅब्युलन्सचीही सोय करण्यात आलीय. मात्र जगतापांच्या कुटुंबियांनी अद्याप त्यांना बाहेर काढण्यासाठी मानसिक तयारी केलेली नाही. कारण भाऊंवर सध्या ज्या पद्धतीचे उपचार सुरु आहेत, त्या पद्धतीचे उपचार त्यांना एअर अॅब्युलन्समध्ये मिळतील याची शक्यता कमी आहे. शिवाय डॉक्टरांनी देखील अद्याप लक्ष्मण जगताप यांना पुण्याबाहेर नेण्यासाठी हिरवा कंदील दाखविलेला नाही. सोबतच मुंबईमध्ये सध्या कोरोनाची साथ पुन्हा एकदा वाढू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com