Laxman Jagtap Death News : पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान झाले : फडणवीसांनी शेअर केला 'तो' फोटो

भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (वय ६०) यांचे मंगळवारी (ता. ३) दीर्घ आजाराने निधन झाले.
Laxman Jagtap Death News : पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान झाले : फडणवीसांनी शेअर केला 'तो' फोटो

Laxman Jagtap Death : भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (वय ६०) यांचे मंगळवारी (ता. ३) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. मितभाषी परंतु; प्रशासनावर वचक असलेले प्रसंगी आक्रमक होणारे नेते म्हणून त्यांची पिंपरी-चिंचवडच्या पंचक्रोशीत ख्याती होती.

जगताप यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ''पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला, अशा शब्दांत उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Laxman Jagtap Death News : पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान झाले : फडणवीसांनी शेअर केला 'तो' फोटो
Maharashtra Police Force Foundation Day : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस

उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते.

आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मी त्यांना मतदानात भाग घेऊ नका, आपली तब्येत सांभाळा असे सांगूनही त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली होती. विधानभवनात पीपीई कीट घालून त्यांचे मतदानाला येणे आणि त्यावेळी अत्यंत प्रेमाने मला दिलेली हाक मी कधीच विसरू शकणार नाही. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com