लक्ष्मणभाऊंचा बहुमत चाचणीसाठी उद्या पुन्हा मुंबईला जाण्याचा निश्चय

Maharashtra Politics| Lakshman Jagtap| देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अत्यंत विश्वासातील म्हणून ओळखले जातात
 Lakshman Jagtap|
Lakshman Jagtap|Sarkarnama

पिंपरी : शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर राज्यात निर्माण झालेल्या दोलायमान राजकीय परिस्थितीवर विधानसभेत बहुमत चाचणी उद्या घेण्याचा आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या सत्तेतील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) काल रात्री दिला. त्याविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर आज साय़ंकाळी निर्णय अपेक्षित आहे.दरम्यान, बहुमत चाचणीचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवला,तर आजारी चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप व पुण्यातील कसबा पेठच्या मुक्ता टिळक हे पुन्हा मुंबईला जाणार का,याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ हे सुद्धा या विश्वासदर्शक ठरावाला कसे हजर राहून मतदान करणार हे ही पाहण्यासारखे आहे. दरम्यान,जीवघेण्या आजाराचा सामना करीत असलेले आ.जगताप यांचा निर्धार पाहता ते पक्षहितासाठी मुंबईला रुग्णवाहिकेतून पुन्हा एकदा जाऊन बहूमत चाचणीत आपले बहूमोल मत पक्षाला देण्याची शक्यता आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्या पाहून त्यांनी पुन्हा मुंबईला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे भाजपचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सरकारनामाला काही वेळापूर्वी सांगितले.

 Lakshman Jagtap|
शिरगणती, व्हिडीओ शुटींग..! राज्यपालांनी घेतलीय पुरेपूर काळजी; काय म्हटलंय आदेशात?

याच महिन्यात १० तारखेला झालेल्या राज्यसभा,तर वीस तारखेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी आ. जगताप हे रुग्णवाहिकेतून पिंपरी-चिंचवडहून मुंबईला मतदानाकरिता गेले होते. त्यात खर्डेकरांनी मोठी भुमिका बजावली होती. ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अत्यंत विश्वासातील म्हणून ओळखले जातात.विधानपरिषद निवडणुकीवेळी आ. जगताप यांना,तर ताप होता. म्हणून पक्षाने येऊ नका असे त्यांना बजावले होते. पण,पक्षहित समोर ठेवून ते गेले होते. त्याबद्दल त्यांचे मोठे कौतूक पक्षाने केले होते.

आता,तर त्यांना ताप नाही. दुसरीकडे ४९ शिवसेन बंडखोर व अपक्ष आमदारांच्या मोठ्या गटाचे समर्थन भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजपला मिळणार आहे.त्यामुळे पुन्हा एकदा भाजप पक्षश्रेष्ठी हे आजारी जगताप व टिळक यांना न येण्याचा आग्रह करण्याची दाट शक्यता आहे.मात्र,तो आ. जगताप,मानतील,अशी चिन्हे सध्या,तरी दिसत नाहीत.

दरम्यान, उद्या पुन्हा आ. भाऊ मुंबईला जाणार का अशी विचारणा केली असता त्याबाबत अद्याप पक्षाने काही कळवले नसल्याचे आ. जगताप यांचे बंधू आणि भाजपचे चिंचवड विधानसभा प्रचारप्रमुख शंकर जगताप यांनी सरकारनामाला सांगितले. भाऊंची तब्येत आता आणखी सुधारली असून त्यांना तापही नाही,असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in