Laxman Jagtap Death News: पिंपरी चिंचवडमधील भाजपचं झुंजार नेतृत्व हरपलं; आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

Laxman Jagtap : आमदार मुक्ता टिळक यांच्यानंतर जगताप यांच्या निधनामुळे भाजपला दुसरा मोठा धक्का..
 Laxman Jagtap News, Pimpri Chinchwad
Laxman Jagtap News, Pimpri Chinchwad Sarkarnama

Laxman Jagtap Death : भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप (वय ६०) यांचे मंगळवारी (ता. ३) दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. मितभाषी परंतु; प्रशासनावर वचक असलेले प्रसंगी आक्रमक होणारे नेते म्हणून त्यांची पिंपरी-चिंचवडच्या पंचक्रोशीत ख्याती होती.

गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने आजारी होते. एप्रिल २०२२ मध्ये त्यांना परदेशात नेवून उपचार करण्यात आले होते. त्यानंतर घरी आल्यानंतर श्‍वसनाचा पुन्हा त्रास होवू लागल्याने त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना मानणाऱ्या कट्टर कार्यकर्त्यांनी व विविध पक्षीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जावून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी सुरुवातीच्या उपचारादरम्यान रुग्णालयात जावून त्यांची व कुटुबियांची भेट घेतली होती.

काही दिवसांपूर्वीच कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं होतं. तो भाजपसाठी मोठा धक्का होता. मात्र, या धक्क्यातून सावरत असतानाच आता जगताप यांच्या निधनामुळे भाजपने दुसरा मोहरा गमावला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली होती. भाजपच्या यांच्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे होते. अशा परिस्थितीत लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतं निश्चितच निर्णायक ठरली होती.

 Laxman Jagtap News, Pimpri Chinchwad
Ahmednagar News : अहमदनगरच्या नामांतरावरुन भाजपमध्येच वाद; सुजय विखे, पडळकर आमने- सामने

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जगताप यांनी १९८६ मध्ये कॉंग्रेसपासून राजकीय कारकिर्द सुरु केली. महापालिकेत सलग ४ वेळा ते पिंपळे गुरव प्रभागातून निवडून गेले. त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष, महापौर अशी पदे भूषविली. महापौर झाल्यानंतर त्यांनी २००३ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्षपद भूषविले. तर; पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर २००४ मध्ये निवडून गेले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या छुप्या पाठींब्यावर २००९ मध्ये व त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर ते आमदार झाले.

२०१४ मध्ये भाजपात गेल्यावर त्यांनी २०१६ मध्ये भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपद भूषविले. जगताप यांनी अगोदर अपक्ष आमदार महेश लांडगे व नंतर माजी महापौर आझम पानसरे यांचा भाजपात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घडवून आणला. त्यांच्या शहराध्यक्षपदाच्या काळात २०१७ ची महापालिका निवडणूक आमदार जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली आणि ऐतिहासिक विजय भाजपने मिळवला. १२८ पैकी ७७ नगरसेवक निवडून आणून एकहाती सत्ता मिळवली. तर; अपक्ष ५ नगरसेवकांचा पाठींबा मिळविला होता.

 Laxman Jagtap News, Pimpri Chinchwad
Pune News : येरवडा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू : कुटुंबियांचा प्रशासनावर गंभीर आरोप

जगताप 2014 मध्ये भाजपमध्ये येईपर्यंत जगताप हे राष्ट्रवादीचे नेते मानले जात होते. 2014 व्यतिरिक्त, त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. जगताप यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही निवडणूक हरली नाही. ते प्रथम 1986 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर 2006 पर्यंत वारंवार विजयी झाले.

जगताप हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन टर्म आमदार आहेत.२००९ ला ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर, २०१४ आणि २०१९ ला भाजपकडून ते विजयी झालेले आहेत. त्यापूर्वी २००४ ला ते विधान परिषदेवर निवडून आले होते.पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदावरून ते नुकतेच पायउतार झाले आहेत. ते शहराचे सध्याचे कारभारी आहेत. भाऊ म्हणून त्यांची ख्याती आहे. गेली ३५ वर्षे ते राजकारणात आहेत.

१९८६ ते २००६ अशी सलग वीस वर्षे पिंपरी-चिंचवड पालिकेत ते नगरसेवक होते. १९९३ ला ते स्थायी समिती अध्यक्ष, तर २००० ला महापौर झाले. २०१४ ची लोकसभा निवडणूक ते शेतकरी कामगार पक्षाकडून लढले. मात्र, त्यात ते पराभूत झाले.शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. तोपर्यंत ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभेला ते भाजपकडून निवडून आले. २०१७ ला पिंपरी पालिकेत प्रथमच भाजप सत्तेत येण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com