महाविकास आघाडीचे सामंजस्य : भोरचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे

भोर पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे लहू शेलार (Lahu Shelar)
महाविकास आघाडीचे सामंजस्य : भोरचे सभापतीपद राष्ट्रवादीकडे
Lahu ShelarSarkarnama

भोर : राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे भोर तालुका पंचायत समितीमध्येही कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची महाविकास आघाडी यशस्वी झाली. मंगळवारी (ता.16) सकाळई पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे लहू शेलार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यांना कॉग्रेसचे पंचायत समिती सदस्य रोहन बाठे व शिवसेनेच्या पूनम पांगारे यांनी पाठींबा दिला. रोहन बाठे हे सभापतीपदाचे उमेदवार लहू शेलार यांना सूचक झाले. सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी काम पाहिले. सभापतीपदासाठी लहू शेलार यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे पिठासन अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सभापतीपदी लहून शेलार यांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे उपस्थित होते.

Lahu Shelar
महाविकास आघाडीचे जय-वीरू कोण? चर्चा तर होणारच...कारणही तसंच हटके

यापूर्वीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीपचे पालन न केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या सभापती दमयंती जाधव व राष्ट्रवादीचेच पंचायत समिती सदस्य श्रीधर केंद्रे आणि मंगल बोडके यांना अपात्र ठरविले. त्यामुळे सहा सदस्य असलेल्या पंचायत समितीत केवळ तीन सदस्य उरले आहेत. त्यामुळे सभापतीपदाच्या त्रांगड्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेक पर्यायांची चर्चा तालुक्यात सुरु होती. परंतु तीनही सदस्यांनी एकत्र बसून निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीचे लहू शेलार सभापतीपदी विराजमान झाले. निवडीनंतर लहू शेलार यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

Lahu Shelar
महाआघाडीत असा आहे पेच : अजितदादा, संजय राऊत आणि थोपटेंचीही कसोटी!

..तर पंचायत समिती बरखास्त झाली असती

सभापतीपदासाठी दोन सदस्यांनी एकत्र आले असते आणि तिस-या सदस्याने राजीनामा दिला असता तर पंचायत समिती बरखास्त झाली असती. त्यामुळे सभापतीपदाच्या निवडणूकीत तीनही पक्षांचे सदस्य एकत्र आले नसते तर तिघांनाही घरी बसावे लागले असते. त्यामुळे राष्ट्रवादीचे लहू शेलार, कॉग्रेसचे रोहन बाठे आणि शिवसेनेच्या पूनम पांगारे यांनी एकत्र बसून घेतलेल्या निर्णयाचे राजकीय जाणकारांनी स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in