कृष्णप्रकाश हे बदलीवर अद्यापही नाराज, पवारानंतर आता ठाकरेंना भेटणार

साईग पोस्टिंगमुळे दुखी झालेले दबंग कृष्णप्रकाश (Krishnaprakash) नव्या ठिकाणी अजून हजर नाही
Police Commissioner Krishnaprakash
Police Commissioner KrishnaprakashSarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) तडफदार पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांनी अगोदर चार वर्षे काम केलेल्या ठिकाणीच त्यांची पुन्हा बदली आणि ती ही मुदतपूर्व झाल्याने ते नाराज आहेत. या बदलीमुळे दुखी असल्याने ते नव्या ठिकाणी (व्हीआयपी, सुरक्षा) आठ दिवसानंतरही हजर झालेले नाही. त्यांची बदली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमुळे झाल्याचे समजले आहे.

दरम्यान, डॅशिंग आणि फीट आयपीएस अधिकारी असलेल्या कृष्णप्रकाश तथा केपींना साईड पोस्टिंग का देण्यात आली असावी, याची चर्चा अद्याप सुरुच आहे. बदली रद्द व्हावी म्हणून त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. आता ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटणार आहेत. कारण त्यांना भेटण्याचा सल्ला पवारांनी दिल्याचे समजते. या भेटीतून त्यांच्या बदलीच्या ठिकाणात बदल होण्याची शक्यता आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी,सुरक्षा) म्हणून त्यांनी अगोदरच काम केलेले आहे. तेथेच त्यांची पुन्हा बदली झाल्याने त्यात दुरुस्ती होऊन त्यांना फिल्ड पोस्टिंग मिळू शकते, असा अंदाज आहे. त्यांचे कुटुंब मुंबईतच असल्याने बदली मुंबईतच करावी, असा त्यांचा आग्रह आहे.

Police Commissioner Krishnaprakash
मला काहीही माहिती नाही! कोरेगाव भीमा दंगलीवर पवारांचा खुलासा

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी वाढल्याने दीड वर्षापूर्वी त्यांना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त, म्हणून नेमण्यात आले होते. मात्र, तेथून बदलताना त्यांना अजिबात विचारण्यात आले नाही. त्यांची मुदतपूर्व उचलबांगडी २० एप्रिलला केली गेली. बोस्टन मॅरेथॉन स्पर्धेसाठी ते अमेरिकेत गेले असताना इकडे त्यांची बदली करण्यात आली. त्यात भरीस भर म्हणजे ते येण्यापूर्वीच त्यांच्या जागी नियुक्त झालेले अंकूश शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी पदभारही घेतला. दरम्यान, त्यांची बदली रद्द व्हावी, यासाठी शहरातील काही संस्था, संघटनांनी मागणी करीत आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

आपली बदली अन्याय असल्याची भावना केपींनी बदलीनंतर 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली होती. त्यातून ते प्रचंड दुखावले गेले आहेत. तरीही सोशल मिडियात ते तेवढेच सक्रिय आहेत. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना मानवंदना करणारे ट्विट त्यांनी गुरुवारी (ता.२८) सकाळीच केले. वीस वर्षाच्या कार्यकाळात ४१ लढाया लढून त्या सर्व जिंकणाऱ्या बाजीराव पेशव्यांना कोटी कोटी नमन असे त्यांनी त्यात म्हटले आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर आता आणखी नवे तंत्रज्ञान, कल्पना आणि सुधारणा ट्विटरमध्ये दिसतील, असे आशावादी ट्विट त्यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. तर, त्यांच्या बदलीचे दुख त्यांच्या त्यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या खालील फेसबुक पोस्टमधून डोकावले होते. त्यातून त्यांनी स्वतच स्वताला धीरही देण्याचा समजावण्याचा प्रयत्नही केला होता.

Police Commissioner Krishnaprakash
ठाकरे, संजय पांडे विरोधात सोमय्या आणखी आक्रमक; उच्च न्यायालयात घेतली धाव...

मेरे पसीने ते मेरे मेहनत की खूशबू आती है

मेरा लहू मेरे रगों मे ईमान का रंग भरता है!

ऐ दौर की दुश्वारिया यॅू न इतरा मेरे हालात पे,

वक्त त वक्त है, आता और जाता है !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com