Pune Crime News : अजितदादांनी हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावाची दखल ; १३ जणांवर कारवाई

Pune Crime News : पुणे शहरात कोयते हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
Pune Crime news
Pune Crime news sarkarnama

Pune Crime News : पुण्यातील अनेक भागात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी कोयता गँगचा मुद्दा उपस्थित केला होता. (Pune Koyta gang News update)

राज्याला 'कोयता गँग' च्या दहशतीतून मुक्त करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे यावेळी केली. 'कोयता गँग'ला मोक्का लावा, तडीपार करा, कोणत्याही परिस्थितीत दहशत मोडून काढा, असेही अजित पवारांनी सभागृहात म्हटले होते

अजित पवारांच्या या मागणीनंतर पुणे पोलिसांनी कोयता गँगवर कारवाई केली आहे. या गँगच्या टोळीप्रमुखासह १३ जणांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापैकी दहा जणांना अटक केली आहे. पुणे शहरात कोयते हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता हातात घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. ही बाब गांभीर्याने घेत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. गुन्हे शाखा आणि सर्व पोलिस ठाण्यांना गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Pune Crime news
karnataka Political News : सुषमा यांच्या 'त्या' विधानाची चर्चा ; जनार्दन रेड्डींच्या एन्ट्रीमुळे नव्या समीकरणांची नांदी

विधीमंडळ अधिवेशनात अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे कोयता गँगच्या दहशतीचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावेळी म्हणाले होते की, पुणे शहर व आसपासच्या उपनगरात'कोयता गँग'ची दहशत आहे.

पुणे परिसरातील मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, मुंढवा रस्ता, हडपसर भागात कोयता गँगच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातल्या अनेक शहरात व उपनगरात हीच परिस्थिती आहे. कोयता गँगचे लोण इतर शहरातही वाढत आहेत. या गँगकडून रस्त्यावर कोयते परजत दहशत निर्माण केली जात आहे.

महाराजा बियर शॉपीच्या समोरील रस्त्यावर गोपाळपटटी चौक, मांजरी बुद्रुक या ठिकाणी ८ ते १० मुलांनी ९ डिसेंबर रोजी काही नागरिकांना दगडाने, बेल्टने मारहाण करुन जखमी केले होते. जाताना गाडीला लावलेले कोयते हवेत फिरवत नागरिकांना 'आम्ही इथले भाई आहे,' तुम्हाला परत येवून बघतो, असे म्हणून दहशत निर्माण केल्यामुळे फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी संघटीतपणे गुन्हा करीत असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Pune Crime news
Balasaheb Patil News : एक मंत्री दोन-तीन खात्यांना न्याय कसा देणार ? ; माजी मंत्र्यांची शिंदे सरकारवर नाराजी

समीर पठाण आणि त्याचे इतर साधीदार शोएब लियाकत पठाण, गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार याच्यावर शहरात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा, मारामारी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख समीर लियाकत पठाण (वय २६ रा. साने गुरुजी वसाहत, माळवाडी, हडपसर, सध्या रा. वैशाली हाईटस, विशाल कॉलनी, मांजरी) आणि त्याचे साथीदार शोएब लियाकत पठाण (वय २० रा. साने गुरुजी वसाहत माळवाडी हडपसर, सध्या रा. वैशाली हाईटस, विशाल कॉलनी, मांजरी), गणेश ऊर्फ दादा हवालदार (वय २२, रा. हवालदार चाळ, महादेवनगर मांजरी) प्रतीक ऊर्फ एस. के. हनुनंत कांबळे (वय २०, रा. साई श्रद्धा पार्क), गीतेश दशरथ सोलनकर (वय २१, रा. ढेरे बंगला, घुले कॉलनी, मांजरी रोड हडपसर), ऋतिक संतोष जाधव (वय १९, रा. महादेवनगर, मांजरी), साई राजेंद्र कांबळे (वय २०, रा. गोपाळपट्टी मांजरी), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४, भाऊसाहेब तुपे नगर, साडेसतरानळी, मांजरी), ऋतिक सुनिल मांढरे (वय २२, महादेवनगर, मांजरी रोड, हडपसर), प्रतीक शिवकुमार सलगर (वय १९, मांजरी) अशी आरोपींची नावे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com