कोश्यारी राज्यपालपदावरून गेले अन् सुमित्रा महाजन राज्यपाल झाल्या, दोन्हीही अफवाच!

Sumitra Mahajan : महाविकास आघाडी सरकारशी असहकार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.
Bhagatsingh koshyari
Bhagatsingh koshyariSarkarnama

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची उचलबांगडी करून आता त्यांच्या जागेवर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याती सोशल झाली असल्याची एकच चर्चा सुरू होती. मात्र आता ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजभवन येथील सूत्रांकडून राज्यपालांची बदली झाल्याच्या सर्व चर्चांचे आता खंडन केले आहे. अद्यापही महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून कोश्यारी कायम आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

Bhagatsingh koshyari
Aditya Thackeray : 'टाटा'नंतर आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर, ठाकरेंचा सरकारवर निशाणा!

5 सप्टेंबर 2019 रोजी कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी विराजमान झाले होते. त्यांची कारकीर्द तीन वर्षात वादळी आणि वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारशी असहकार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. मविआने सांगितलेल्या राज्यपालनियुक्त बारा आमदारांची त्यांच्याकडून नियुक्ती झाली नाही. यावरून बराच गदारोळ माजला होता. महाविकास आघाडीकडून कोश्यारींची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी अनेक वेळा मागणी केली आहे.

राज्यपालपदी म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही त्याच राज्यातील व्यक्ती नसावी, असा आजवरचा सर्वसाधरण संकेत आहे. एखाद्या राज्याचा राज्यपाल ही त्या राज्याची व्यक्ती नसेल, असा नियम पाळला जातो. महाजन यांचा जन्म हा महाराष्ट्रातला आहे. महाजन याचं माहेर ही महाराष्ट्रातलं आहे, तर त्यांचं सासर हे मध्यप्रदेश आहे. यामुळेच त्यांचं सदरच्या दोन्ही राज्यात राज्यपापदी नियुक्ती होणं, तांत्रिकदृष्ट्या शक्य होणारे नाही. यामुळे सोशल मीडियावरची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट होत आहे.

Bhagatsingh koshyari
Marathwada : नांदेड, हिंगोली जिल्ह्यात आठवडाभर असणार भारत जोडो यात्रा..

सुमित्रा महाजन यांचे महाराष्ट्र कनेक्शन :

महाजन यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून या ठिकाणी झाला. काही काळाने महाजन कुटुंब मुंबईत स्थिरसावर झालं. सुमित्रा महाजन यांचा विवाह इंदूरचे अधिवक्ते जयंत महाजन यांच्याशी झाला. म्हणून विवाहानंतर त्या इंदूरमध्येच स्थायिक झाल्या. १९८९ ते २०१९ अशा सलग आठ वेळा इंदूर लोकसभा मतदार संघातून त्या निवडून आल्या. लोकसभेचं अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com