सोमय्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास मी बांधील नाही !

सोमय्या यांच्या कोणत्या तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित यंत्रणाकडे तक्रारी कराव्यात.
Anil Parab
Anil Parab sarkarnama

पुणे : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी आज भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. "सोमय्या यांच्या कोणत्या तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित यंत्रणाकडे तक्रारी कराव्या," असे परब म्हणाले. (Anil Parab latest news)

'अनिल परब यांच्या दापोलीतील जमीन व्यवहारप्रकरणी विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ शकतो,' अशी भीती सोमय्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर परब म्हणाले, "किरीट सोमय्या म्हणजे कोणती एजन्सी नाही आणि त्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. ज्या तपास यंत्रणा आहे त्यांना मी उत्तर देत आहे. माझा कोकणातील जमीन व्यवहार पारदर्शक असून विभास साठे यांच्याकडून मी जमीन विकत घेतली आणि पुढे त्याची विक्री केली आहे. सोमय्या यांना कोणत्या तक्रारी असतील तर त्यांनी संबंधित यंत्रणाकडे तक्रारी कराव्या,"

Anil Parab
'झुकेंगे नहीं': काँग्रेसचा 'पुष्पा'अंदाज, सोनिया, राहुल यांना EDच्या नोटीशीनंतर मोदींवर टीका

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने 75 व्या वर्षात पदार्पण केले आहे.पहिली बस ज्या दिवशी धावली त्याचे औचित्य साधून त्याच मार्गावर पहिली ई बस आज पुण्यातून सुरू करण्यात आली. या कार्यक्रमास अनिल परब उपस्थित होते.

ते म्हणाले, "ज्याएसटी कर्मचारी यांनी मागील 25 वर्ष कोणताही अपघात न करता सेवा दिली त्यांचा 25 हजार रुपये देवून सत्कार करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्ष एसटी स्थानकावर खर्च नाही. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अद्यावत बस स्थानक तयार करण्यात येईल,"

"बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे काम करण्यात येणार आहे. दुर्देवाने एसटी बस पोर्ट औरंगाबाद आणि पनवेल येथे मान्यता मिळालेली नाही. एसटी पूर्वपदावर येत असून लवकरच चांगल्या सुविधा देण्यात येतील. पुण्यातील शिवाजीनगर स्थानक याठिकाणी मेट्रो काम सुरू असून त्याजागी नवीन स्थानक निर्मिती बाबत चर्चा सुरू आहे. ई बस पहिल्या टप्प्यात 150 मिळणार असून त्या कोणत्या जागी नेम्याच्या आहे त्याबाबत अभ्यास करून सेवा सुरू केली जाईल," असे परब म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com