Crime news : सरपंच १० कोटी व्हाईट करायला गेला अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Crime news : या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा एका गावचा सरपंच असल्याचं समोर आलंय
Crime news
Crime newsSarkarnama

Crime news : ५० लाखांच्या खंडणीसाठी पुणे मार्केट यार्डमधून तिघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अपहरण झालेल्या तिघांची सुटका केली. मात्र, या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा एका गावचा सरपंच असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.

सध्या हा सरपंच फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर अपहरण झालेल्या व्यक्तींकडे सरपंचाने काळे पैसे पांढरे कारण्यासाठी ३४ लाख रुपये दिले होते. पण ठरल्याप्रमाणे त्या व्यक्तींनी सरपंचाला पैसे काळ्याचे पांढरे करून दिले नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे.

Crime news
Balasaheb Thorat News : भाच्याची बंडखोरी, मेव्हण्याचे निलंबन तरी थोरातांची चुप्पीच

नेमकी प्रकरण काय आहे?

अहमदनगरच्या (Ahmednagar) श्रीगोंद्यातील वांगदरी या गावचा सरपंच हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आहे. या सरपंचाचे नाव आदेश नागवडे असे असून ही घटना घडल्यानंतर हा सरपंच फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आदेश नागवडे याने त्याच्याकडील असणारे काळे पैसे पांढरे करण्यासाठी अपहरण केलेल्या व्यक्तींना दिले होते. तर अपहरण झालेल्या व्यक्तींनी त्या सरपंचाकडून फी आणि टोकन अमाउंट असे तब्बल ३४ लाख रुपये घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.

Crime news
Congress : डॉ. सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची टांगती तलवार

एवढंच नाही तर या सरपंचाला १० कोटी रुपये पांढरे करुन हवे होते. पण अपहरण झालेल्या व्यक्तींनी ठरल्याप्रमाणे काम केले नाही. त्यामुळे सरपंच आणि त्याच्या काही साथीदारांनी काळे पैसे पांढरे करण्यासाठी दिलेल्या तिघांचे थेट अपहरण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील एका लॉजवरून या तिघांना ताब्यात घेतले.

प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचे इतर काही साथीदार फरार झाले. त्यांचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime news
IPS Vaibhav Nimbalkar : आयपीएस वैभव निंबाळकर यांना थेट 'डिआयजी'पदी बढती!

अपहरण झालेल्या दोघांमध्ये एक नातेवाईक तर दुसरा त्याचा मित्र होता. ते कामानिमित्त ते पुण्यात आले होते. याच दरम्यान गुरुवारी दुपारी मार्केट यार्ड परिसरातून तिघांचे अपहरण करण्यात आले.

यानंतर अपहरण झालेल्यांपैकी एक जणाने व्हॉट्सअपद्वारे व्हिडीओ कॉल करत याची माहिती दिली. तसेच मारहाण होत असल्याचे दाखवले. त्यानंतर यांना सोडायचे असेल तर ५० लाख रुपये खंडणीची मागणी आरोपींनी केली. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांना याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीवरुन आरोपींचा माग काढला. आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. तर यावेळी काही आरोपी पळून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in