खडसे, राजू शेट्टींचे नाव कुठयं...याचा फैसला होणार

अनिल गलगलीयांच्या आव्हान अर्जावर मंगळवारी (ता.१५) सुनावणी होणार
khadse-shetti2.jpg
khadse-shetti2.jpg

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधान परिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ जणांच्या नावांची निवड करून राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठविली होती ती यादी माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली होती. याला दिलेल्या आव्हान अर्जावर मंगळवारी (ता.१५) राजभवन सचिवालयात सुनावणी होणार आहे.(Khadse, where is Raju Shetty's name ... it will be decided )

विधान परिषदेवर मुख्यमंत्री, मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपालनियुक्त सदस्य नेमणुकीबाबत राज्यपालांकडे सादर केलेली यादी देण्याची मागणी गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे २२ एप्रिल रोजी केली होती. तसेच सदस्य नेमणुकीबाबत राज्यपालांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची माहितीही मागवली होती. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जनमाहिती अधिकारी (प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने आपणास उपलब्ध करून देता येत नाही, असे उत्तर राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी अर्जावर १९ मे रोजी दिले होते. संभ्रमित करणाऱ्या माहितीबाबत प्रथम अपील दाखल केले होते. त्यावर मंगळवारी सकाळी सुनावणी होणार आहे. राज्यपालाच्या उपसचिव असलेल्या प्राची जांभेकर यांच्यासमोर सुनावणी होऊन त्या निर्णय देतील.

माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री एकनाथ खडसे यांची नावे या यादीत आहेत का? हे या सुनावणीतून कदाचित स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले. खडसे यांनी भाजपातून राष्ट्रवादीत तर माजी खासदार शेट्टी हे एकेकाळी भाजपा आघाडीसोबत होते. हे दोनही नेते आता भाजपाच्या विरोधात असल्याने राज्यपाल नियुक्त यादीत त्यांची नावे आहेत कॉ आणि असली तरी राज्यपाल त्याला मान्यता देणार का ? हा खरा प्रश्‍न आहे.
Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com