Katraj Dairy News : केशरताई पवार यांचा पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा : अजित पवारांकडे केला सुपुर्त

एकुण ७०२ मतांपैकी तब्बल ५४८ म्हणजेच ७८ टक्के मते मिळवित केशरताई पवार यांनी विजयाला गवसणी घातली हेाती.
Katraj Dairy -Keshartai Pawar
Katraj Dairy -Keshartai PawarSarkaranam

पुणे : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) पहिल्या महिला अध्यक्षा तथा महानंदच्या संचालिका केशरताई सदाशिव पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अध्यक्षपदाचा ठरलेला एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मुंबईत जाऊन हा राजीनामा त्यांनी सुपूर्द केला आहे. (Keshartai Pawar, president of Pune District Milk Union (Katraj Dairy) resigns)

दरम्यान, आपल्या कार्यकालात अत्यंत स्वच्छ कारभार करुन कात्रज डेअरीचा (Katraj Dairy) नावलौकीक, उत्पन्न, उलाढाल हे सर्व वाढविण्यात यश मिळाल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.

Katraj Dairy -Keshartai Pawar
'Kerala Story' VS 'Real Kerala Story' ‘केरला स्टोरी’ ला उत्तर देण्यासाठी विजयन सरकारने आणली 'द रियल केरला स्टोरी'

केशरताई पवार या २००० मध्ये पहिल्यांदा पुणे (Pune) जिल्हा दूध उत्पादक संघात संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. मागील वर्षी झालेली मार्चमधील निवडणूक ही त्यांची चौथी निवडणूक होती. जिल्ह्यातील एकुण ७०२ मतांपैकी तब्बल ५४८ म्हणजेच ७८ टक्के मते मिळवित केशरताई पवार यांनी विजयाला गवसणी घातली हेाती. त्यांचा विजय संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा ठरला होता.

Katraj Dairy -Keshartai Pawar
Aryan Khan Case : समीर वानखेडेंची गेल्या दोन तासांपासून सीबीआयकडून चौकशी : जाताना म्हणाले ‘सत्यमेव जयते’

मागील निवडणुकीत त्यांची उमेदवारी शिरुर तालुका प्रतिनिधी म्हणून जाहीर करण्यात आली होती. मात्र, अचानक त्यांना संपूर्ण पुणे जिल्ह्यातून महिला मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी उत्तम प्रचार यंत्रणा राबवत विजय मिळविला होता. त्यातील मताधिक्यही लक्षवेधी ठरले होते. त्या पार्श्वभूमिवर राज्याचे तत्कालीन उपमुपख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कात्रज डेअरीचे अध्यक्ष बनविले होते. त्यामुळे केशरताई पवार या पुणे जिल्हा दूध संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या. (Katraj Dairy)

Katraj Dairy -Keshartai Pawar
Maharashtra Politic's : मलाही एकनाथ शिंदेंकडून ऑफर होती : शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

त्यांना एप्रिल-२०२२ मध्ये पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मान मिळाला होता. अध्यक्षपदाचा कालावधी हा एक वर्षासाठी ठेवण्यात आले होते. त्यामुळे आपला कार्यकाल संपताच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे मुंबईत जाऊन सुपूर्द केला. दरम्यान, पक्षाने त्यांना २०१६ मध्ये उपाध्यक्षपदाचीही संधी दिली होती, तर पाच महिन्यांपूर्वी त्यांना महानंदचे संचालकपदही देण्यात आले आहे.

निवृत्ती महाराज देशमुखांना गोबर गॅस प्रकल्प?

केशरताई पवार यांच्यावर गेल्या वर्षभरात अनेक आरोप झाले. त्याद्वारे त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाला. मात्र, त्यांनी दूध सॅंपल टेस्टिंगमधील गैरव्यवहार उघडकीस येताच पाच कर्मचाऱ्यांना सात महिन्यांपूर्वीच निलंबित केले हेाते. पुणे जिल्ह्यातील ९१८ दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानावर गोबर गॅस प्रकल्पाचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचे प्रस्तावही तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, या गोबर गॅसमधील एक प्रकल्प प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्त महाराज देशमुख यांना दिल्याची चर्चा पुणे जिल्ह्यात रंगली आहे. मात्र, त्यावर केशरताई पवार यांनी मौन बाळगले आहे, त्याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com