आठ वेळा बिनविरोध निवडून येणाऱ्या मामाला सख्खा भाचा देणार आव्हान!

कात्रज दूध संघ निवडणूक : मुळशीत रामचंद्र ठोंबरे यांच्याविरोधात कालिदास गोपालघरे यांच्यात लढत होणार
Kalidas Gopalghare-Ramchandra Thombre
Kalidas Gopalghare-Ramchandra ThombreSarkarnama

पौड (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) निवडणुकीसाठी मुळशी तालुक्यात ज्येष्ठ संचालक रामचंद्र ठोंबरे आणि कालिदास गोपालघरे या सख्ख्या मामा-भाच्यामध्ये लढत होणार, हे जवळपास नक्की आहे. कारण त्यांची तशी तयारी झाली आहे. त्यामुळे गेली ४२ वर्षांची परंपरा ठोंबरे कायम ठेवणार की गोपालघरे त्याला छेद देणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तथापि, पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत मुळशीत सत्तांतर झाल्यामुळे या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) पदाधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार, हे मात्र नक्की. (Katraj Dudh Sangh Election: Kalidas Gopalghare will fight against Ramchandra Thombre in Mulshi)

मुळशी तालुक्यात सहकाराची उभारणी (स्व.) मामासाहेब मोहोळ यांनी केली, त्यांच्या काळात तालुक्यात जवळपास ८० दूध संस्था कार्यरत होत्या. कात्रज दूध संघावर रामचंद्र ठोंबरे हे तब्बल आठ वेळा बिनविरोध निवडून गेले आहेत. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. परंतू खासगी दूध संघाची स्पर्धा आणि राजकीय खेळी यामुळे तालुक्यातील सहकारी दूध संस्था टिकविण्यात त्यांना अपयश आले. कालांतराने दूध संस्थांना मोठ्या प्रमाणात घरघर लागली.

Kalidas Gopalghare-Ramchandra Thombre
तृप्तीच्या कुटुंबाचा विरोध गृहीत धरला होता...पण मी नशिबवान निघालो!

दूध संघाच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत ठोंबरे यांच्या भाचेसून वैशाली गोपालघरे या महिला प्रवर्गातून विजयी झाल्या होत्या. त्या गेली पाच वर्षांपासून दूध संघाच्या उपाध्यक्षपद म्हणून काम करत आहेत. त्यांनीही तालुक्यातील सहकारी दूध संस्थांना पाठबळ त्या वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ठोंबरे आणि कालिदास गोपालघरे या मामा-भाच्यामध्येच पुन्हा दूध संस्था पुनर्जिवित करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. पण, २० मार्चला होणाऱ्या निवडणुकीसाठी मात्र केवळ पंधरा मतदारच ठोंबरे आणि गोपालघरे यांचे भवितव्य ठरविणार आहेत.

Kalidas Gopalghare-Ramchandra Thombre
यड्रावकर सेनेला शिरोळमधून हद्दपार करा : शिवसेना कोट्यातील राज्यमंत्र्यांवर जिल्हाप्रमुखांचा हल्लाबोल

पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत कडवे आव्हान पेलत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आत्माराम कलाटे यांची २२ वर्षांची अखंड परंपरा मोडीत काढली आहे, त्यामुळे सुनील चांदेरे यांना उपाध्यक्षपदी संधी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुळशीच्या राष्ट्रवादीला सरप्राईज गिफ्ट दिले आहे. निष्ठावंतांच्या पाठीशी राहण्याचे काम राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बॅंकेच्यावेळी केले, त्यामुळे आता दूध संघाच्या निवडणुकीतही तालुक्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Kalidas Gopalghare-Ramchandra Thombre
उमेदवारी नाकारल्याने ३० वर्षे संचालक असलेल्या ढमढेरेंचा राष्ट्रवादीविरोधातच शड्डू!

सहकार क्षेत्रातील मुरब्बी राजकारणी म्हणून रामचंद्र ठोंबरे यांची ओळख आहे. कालिदास गोपालघरे यांनाही दूध संघ आणि दूध संस्थेचा खडान्‌खडा अभ्यास आहे. जिल्हा बॅंकेप्रमाणेच दूध संघाची निवडणूकही न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने दोन वर्षे लांबली होती. परंतू दोघांनीही आपले मतदार सुरक्षितस्थळी ठेवले आहेत, त्यामुळे मामा-भाच्याच्या संभाव्य लढाईत कोण बाजी मारणार, याची संपूर्ण तालुक्याला उत्कंठा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in