अशोक पवारांची व्यूहरचना यशस्वी ठरली आणि शिरूरमधून तिघे ‘कात्रज’मध्ये पोचले!

कात्रज डेअरी निवडणूक : आमदार अशोक पवारांच्या राजकीय डावपेचामुळे शिरूरमधून राष्ट्रवादीच्या तिघांना संधी
Ashok Pawar
Ashok PawarSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीपासून विरोधकांना एकेक धक्के देत त्यांना नामोहरण करणाचा सिलसिला कायम ठेवला आहे. कात्रज दूध संघाचा (Katraj Dairy) निकालही तेच सांगणारा असून पवारांच्या राजकीय कौशल्यामुळेच शिरूरमधून तब्बल तीन संचालक जिल्हा दूध संघात जाणे हे शक्य झाले आहे. कात्रज डेअरीत शिरूरमधून केशरताई पवार, स्वप्निल ढमढेरे आणि निखील तांबे असे तिघे पोचले आहेत. या तिघांसाठी अशोक पवार यांनीच व्यूहरचना आखली होती. विधानसभेपासून सुरू झालेला जिंकण्याचा सिलसिला जिल्हा बॅंक आणि आता दूध संघाच्या निवडणुकीतही अशोक पवारांचे राजकीय कौशल्य दाखवून देणारा आहे. (Katraj Dairy : Opportunity for three from Shirur due to MLA Ashok Pawar's political maneuver)

केशरताई पवार या २००० पासून जिल्हा दूध संघात (एक टर्म वगळता) तीन टर्म महिला संचालिका राहिल्या आहेत. त्यांना यावेळी खुल्या गटातून म्हणजेच अ वर्ग मतदार संघातून शिरूर तालुक्यातून उभे राहायचे होते. त्यांच्या अपेक्षेनुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार अशोक पवार यांचा त्यांना होकार मिळाला. पण, ही उमेदवारी जाहीर केली ती गृहमंत्री वळसे पाटील यांनी. अर्थात वळसे पाटलांनी उमेदवारी जाहीर करतानाच काही तरी डाव असल्याची शंका राजकीय धुरिणांना होती आणि ती पुढे खरी निघाली. कारण, ‘अ’ वर्ग मतदार संघात विद्यमान संचालक बाळासाहेब ढमढेरे यांच्यासह त्यांचा मुलगा स्वप्निल ढमढेरे यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने काहीतरी घडणार हे नक्की होते. त्यानंतर वेगाने चक्रे हलली अणि केशरताईंना पुन्हा महिला मतदार संघातून उमेदवारीची घोषणा पक्षाकडून करण्यात आली. स्वप्निल ढमढेरेंना अ मतदार संघातून उमेदवारी नक्की झाली.

Ashok Pawar
पार्थ पवारांच्या निवडणूक लढविण्यावर रोहित पवार म्हणाले, मी कायम पार्थसोबतच..!

दोन्ही मतदार संघातील उमेदवार ‘मातब्बर’ असल्याने आमदार पवारांनी दोन्ही संचालक आपल्या बाजूचे पर्यायाने राष्ट्रवादीचे होतील, याची दक्षता घेतली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णयही तसेच झाले. आमदार पवार तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातून रांजणगाव सांडस येथील नवख्या कार्यकर्त्याला पक्षाला उमेदवारी द्यायला लावली. या ठिकाणीही पवार यशस्वी होत त्यांनी शिरूरमधून तब्बल तीन संचालक कात्रजमध्ये पाठविले.

Ashok Pawar
फडणवीसांचा बैलगाडा ठरला फायनलसम्राट; बैलाची किंमत ऐकून विरोधी पक्षनेतेही अवाक्‌!

...आणि वळसे पाटलांनी घोषणा केली

केशरताई पवार यांची उमेदवारी कुठल्या मतदार संघातून हवी, याचा निर्णय त्यांचे दीर, माजी सभापती प्रकाश पवार घेत होते. त्यांची राजकीय व्यूहरचना उत्तम असल्याने त्यांनी सुत्रे जुळविली आणि केशरताईंच्या उमेदवारीची घोषणा गृहमंत्री वळसे-पाटील यांना शिरूरच्या एका कार्यक्रमात करायला लावली.

Ashok Pawar
राणेंना उच्च न्यायालयाचा दिलासा; अनधिकृत बांधकामप्रकरणी कारवाई न करण्याचे निर्देश

तरुणांना संधी

पुणे जिल्हा सहकारी बॅंक गाजवणारे माजी संचालक निवृत्तीआण्णा गवारे, त्यानंतर आता तितक्याच ज्येष्ठतेचे बाळासाहेब ढमढेरे या दोघांनाही शिरूरच्या राजकारणातून अलगदपणे बाजूला करण्यात आले आहे. गवारे यांच्या जागी खुद्द अशोक पवार, तर ढमढेरेंच्या जागी त्यांच्या चिरंजावांना संधी देत तरुणांना पुढे आणले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com