वळसे पाटलांचे कट्टर समर्थक, दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगेंना शिवसेनेच्या अरुण गिरेंचे आव्हान

कात्रज डेअरी निवडणूक : वळसे पाटलांच्या कट्टर समर्थक दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांना आंबेगावातून माजी खासदार आढळरावांचे सहकारी, शिवसेनेचे अरुण गिरेंचे आव्हान
Arun Gire-Vishnu Hinge
Arun Gire-Vishnu HingeSarkarnama

पारगाव (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील ‘अ’ वर्ग गटातून जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शिवसेनेचे (shivsena) तालुकाप्रमुख अरुण गिरे यांच्यात लढत होत आहे. राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले राष्ट्रवादी व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या तालुकाध्यक्षामधील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Katraj Dairy Election : Shiv Sena's Arun Gire challenges Dudh Sangh president Vishnu Hinge in Ambegaon)

विष्णू हिंगे हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसने हिंगे यांचे नाव जिल्हा दूध संघासाठी एकमुखाने जाहीर करण्यात आले होते. ते सहाव्यांदा जिल्हा दूध संघाची निवडणूक लढवत असून १९९३ पासून मध्यंतरीची काही वर्ष वगळता आत्तापर्यंत सलग संचालक म्हणून दूध संघात कार्यरत आहेत. तसेच २०१५ पासून ते दूध संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संघाच्या नफ्यात वाढ झाली आहे. मागील सहा वर्षांच्या कालावधीत संघाच्या निव्वळ नफ्यात एकूण १६.२४ कोटींची वाढ झाली आहे. व्यापारी नफा २२४.४९ कोटींवर गेला आहे. मुदत ठेवीमध्येही ३३.८८ कोटींची वाढ झाली असून दूध संस्थाना दूध फरक वाटपात ४०.२८ कोटींची वाढ झाली आहे. दूग्धजन्य पदार्थ विक्रीत ३२.१५ कोटी रुपयांची वाढ झाली दूध संस्थाना लाभांश वाटपातही ५.१४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सन २०२०-२१ मध्ये १५ टक्के लाभांश वाटप केला आहे.

Arun Gire-Vishnu Hinge
एकनाथराव, त्या २५ आमदारांची यादी द्या; सरकार कसे बनवायचे, हे मी सांगतो : मुनगंटीवार

अरुण गिरे हे शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे विश्वासू सहकारी असून ते तालुका प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पहिले असल्यामुळे त्यांचाही तालुक्यात चांगला संपर्क आहे. त्यांनी मागील पंचवार्षिकलाही हिंगे यांच्या विरुध्द उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यांनी त्यावेळी माघार घेतल्याने हिंगे यांची बिनविरोध निवड झाली होती. या वेळी महाविकास आघाडी असल्याने गिरे माघार घेतील अशी चर्चा तालुक्यात होती. पण, पक्षाने सांगितले म्हणून मी अर्ज दाखल केला आहे. पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाणार नसल्याने मी माघार घेतली नाही, असे त्यांनी सांगितले. गिरे यांनी हे आंबेगावमधून ‘अ ’ गट आणि इतर मागास प्रवर्ग अशा दोन गटांमधून निवडणूक लढवत आहेत.

Arun Gire-Vishnu Hinge
संजय शिंदेंचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा उपाध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीच्या बैठका, तर शिवसेनेच्या गोटात शांतता

आंबेगावमध्ये ‘अ’ गटात एकूण ४८ मतदार असून तीन चार अपवाद वगळता बहुतांश मतदार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराचे आहेत. तालुक्यातील अ गटावर राष्ट्रवादीची मजबूत पकड असतानाही पक्षाने नियोजनाच्या बैठका सुरु केल्या आहेत. मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, शिवसेनेत मात्र अद्याप शांतता दिसून येत आहे.

Arun Gire-Vishnu Hinge
छत्रपती कारखाना जिंकण्यासाठीच राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांनी हा डाव टाकला : जाचकांचा आरोप

...म्हणून दूध संघासाठी गिरेंची उमेदवारी

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला विचारात घेतले नव्हते. तसेच, आंबेगाव तालुक्यात सध्या सुरू सहकारी सोसायटीच्या निवडणुकात राष्ट्रवादीने शिवसेनेला झुंजायला लावल्याने अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये संघर्ष पहावयास मिळाला. कदाचित त्यामुळेच शिवसेनेच्या अरुण गिरे यांची उमेदवारी कायम राहिली असावी, अशी चर्चा रंगली आहे.

Arun Gire-Vishnu Hinge
मुनगंटीवारांचा राऊतांना टोमणा; अजितदादांचा निर्णय फिरवल्याची करून दिली आठवण

...ही तर नुरा कुस्ती : भाजप

राष्ट्रवादी आणि शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र आहेत. मात्र, दोन्ही पक्षाचे तालुकाध्यक्ष जिल्हा दूध संघाला एकमेकांच्या विरुध्द म्हणजे मतदारांची दिशाभूल आहे. विजय कोण होणार हे माहित असतानाही निवडणूक होत आहे; म्हणजे ही नुरा कुस्ती आहे, यातून दूध उत्पादकांना काही फायदा होईल असे वाटत नाही, असे भाजपचे आंबेगाव तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in