कात्रज डेअरी : राष्ट्रवादीने विरोधकांना दाखवला कात्रजचा घाट; १६ पैकी १५ जागांवर विजय

भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे हे वगळता राष्ट्रवादीकडून घोषित सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत आपली ‘कात्रज’वरील हुकूमत कायम ठेवली आहे.
Katraj Dairy Election
Katraj Dairy ElectionSarkarnama

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी, Katraj Dairy) पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) १६ पैकी १५ जागा जिंकत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मतदानापूर्वीच जिल्हा दूध संघातील १६ पैकी ५ संचालक बिनविरोध निवडले गेले होते. त्यात आता आणखी ११ संचालकांची भर पडून राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कात्रज’वरील आपला ताबा आणखी घट्ट केला आहे. (Katraj Dairy Election : Big victory for NCP; Won 15 out of 16 seats)

पुणे जिल्हा दुध संघाच्या पंचवार्षिक संचालकपदासाठीच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.२० मार्च) मतदान झाले. त्यानंतर सोमवारी (ता. २१ मार्च) सकाळी कात्रज डेअरीच्या मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी पार पडली.

Katraj Dairy Election
कात्रज डेअरी : ऐनवेळी मतदारसंघ बदलूनही केशरताई पवारांची विक्रमी मतांनी बाजी!

गोपाळराव म्हस्के (हवेली), भगवान पासलकर (वेल्हे), राहुल दिवेकर (दौंड) आणि अनुसूचित जाती-जमाती गटामधून चंद्रकांत भिंगारे हे चार राष्ट्रवादीचे, तर पुरंदरमधून मारुती जगताप हे काँग्रेसचे संचालक सहकार पॅनेलच्या माध्यमातून यापूर्वीच संचालक मंडळात पोचले. उर्वरित ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात होते. भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे हे वगळता राष्ट्रवादीकडून घोषित सहकार पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत आपली ‘कात्रज’वरील हुकूमत कायम ठेवली आहे.

Katraj Dairy Election
भाच्याकडून मामाची ४२ वर्षांची सत्ता खालसा : राष्ट्रवादीने मुळशीला दिले दोन संचालक!

कात्रज डेअरी निवडणुकीतील तालुका व मतदारसंघनिहाय उमेदवार व त्यांना मिळालेली मते. विजयी-पराभूत उमेदवार व त्यांची मते :

आंबेगाव (एकूण मतदान ४८) : राष्ट्रवादीचे विष्णू हिंगे (३५ मते, विजयी) शिवसेनेचे अरुण गिरे (१२ मते, पराभूत, १ अवैध)

भोर (एकूण मतदान ७०) : अपक्ष दिलीप थोपटे (३८ मते, विजयी), दीपक भेलके (१९ मते, पराभूत), काँग्रेसचे अशोक थोपटे (१२ मते, पराभूत, अवैध १)

खेड (एकूण मतदान १०६) : राष्ट्रवादीचे अरुण चांभारे (५५ मते, विजयी), अपक्ष चंद्रशेखर शेटे (५१ मते, पराभूत)

जुन्नर (एकूण मतदान १०९) : राष्ट्रवादीचे बाळासाहेब खिलारी (६१ मते, विजयी), अपक्ष देवेंद्र खिलारी (४७ मते, पराभूत, अवैध १)

मावळ (एकूण मतदान २१) : राष्ट्रवादीपुरस्कृत भाजप उमेदवार बाळासाहेब नेवाळे (१९ मते, विजयी), लक्ष्मण ठाकर (२ मते, पराभूत), सुनंदा कचरे(निरंक)

मुळशी (एकूण मतदान १५) : राष्ट्रवादीचे कालिदास गोपाळघरे (९ मते, विजयी), रामचंद्र ठोंबरे (निरंक)

शिरूर (एकूण मतदान १६८) : राष्ट्रवादीचे स्वप्निल ढमढेरे (१३० मते, विजयी) योगेश देशमुख (३६ मते, पराभूत, अवैध २).

महिला प्रतिनिधी (२ जागा) : केशरताई पवार (शिरूर, ५४८ मते-विजयी), लता गोपाळे (खेड, ४३७ मते-विजयी), रोहिणी थोरात (दौंड, ८५ मते, पराभूत) संध्या फापाळे- (जुन्नर, २०४ मते, पराभूत )

इतर मागास प्रवर्ग (१ जागा) राष्ट्रवादीचे भाऊ देवाडे (जुन्नर, ४४८ मते, विजयी), वरूण भुजबळ (जुन्नर, १९३ मते पराभूत), अरुण गिरे (आंबेगाव, ३६ मते पराभूत).

भटक्या जाती विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ : (१ जागा) : राष्ट्रवादीचे निखिल तांबे (शिरूर, ४५० मते, विजयी), प्रदीप पिंगट (जुन्नर, २३४ मते पराभूत).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com