कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरण; जागा मालकासह चार जणांवर गुन्हा दाखल

Pune |Crime news| Gas leakage case| सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
Katraj cylinder explosion case News
Katraj cylinder explosion case News

पुणे : कात्रजमधील (Katraj) २२ सिलेंडर स्फोटप्रकरणी पुणे पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. व्यवसायिक सागर पाटील यांच्यासह संबंधित जागेचा मालक आणि आणखी २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी बेकायदेशीरपणे सिलेंडर भरण्याचे काम चालत होते. मात्र गॅस गळतीमुळे मंगळवारी एकापाठोपाठ २०-२२ सिलेंडरचे स्फोट झाले. धक्कादायक म्हणजे याठिकाणी अनधिकृतरित्या सिलेंडरचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. १४१ छोटे तर २६ मोठे सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत. (Katraj cylinder explosion case latest news)

मंगळवारी सायंकाळी कात्रज येथील सुधामाता मंदिर परिसरात एका पाठोपाठ २२ सिलिंडरचे स्फोट झाले. सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना हे स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा उसळत होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर एकूण आठ गाड्यांद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. हा परिसर तीव्र डोंगर उताराचा असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचण्यात अडचणी येत होत्या. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी २०० मीटर अंतरावरून पाणी आणून आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

Katraj cylinder explosion case News
दारुच्या नशेत झिंगलेल्या ग्रामसेवकाची सभेत हजेरी; पहा vedio

दरम्यान, या स्फोटात एक कार आणि एक छोटे मालवाहू वाहनाचे नुकसान झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर स्वारगेट विभागाच्या सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, यांच्यासह पोलिस कर्मचारीही घटनास्थळी हजर झाले होते.

वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधामाता मंदिर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या सिलिंडरमधून छोट्या पाच किलोच्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचे काम अवैधपणे सुरु होते. पण सिलेंडर भरत असताना अचानाक सिलिंडरमधून गॅस गळती होऊ लागली. गॅस गळतीमुळेच हे स्फोट झाले असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन १६ रिकामे आणि आठ भरलेले मोठे सिलिंडर जप्त केलेआहेत.

हे स्फोट इतके भयंकर होते की तेथून काही अंतरावर असलेल्या एका घरावरील पाण्याची टाकी फुटलेल्या सिलिंडरचा तुकडा लागल्याने फुटली. स्फोटांच्या आवाजामुळे एका घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. स्फोटांच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील मुलांमध्येही घबराट परसरली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com