काश्मीर फाईल्स नाही तर झुंड, पावनखिंडही टॅक्स फ्री करा : रा. स्व संघाची मागणी

काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटावरुन बराच वाद सुरु आहे.

काश्मीर फाईल्स नाही तर झुंड, पावनखिंडही टॅक्स फ्री करा : रा. स्व संघाची मागणी
sarkarnama

पुणे : ''काश्मीर फाईल्स, झुंड, पावनखिंड या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. त्यात 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट काही राज्यांनी टॅक्स फ्री केला आहे. या चित्रपटासोबत झुंड (Jhund), पावनखिंड हे चित्रपटही महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावेत, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काश्मीर फाईल्स, झुंड,पावनखिंड हे चित्रपट टॅक्स फ्री करावेत ही लोकांची भावना आहे, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही तीच भावना आहे, असे सुरेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटावरुन बराच वाद सुरु आहे. एकीकडून या चित्रपटाला पाठिंबा मिळत असला तरी दुसरीकडे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.


काश्मीर फाईल्स नाही तर झुंड, पावनखिंडही टॅक्स फ्री करा : रा. स्व संघाची मागणी
ठाकरे सरकारमधून राजू शेट्टी बाहेर पडणार? राऊत म्हणाले..

सध्या ‘द काश्मीर फाइल्स’च्या निमित्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी तसेच अभिनेत्री पल्लवी जोशी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये दौरे करत आहेत. अनेक मान्यवरांना ते मागील काही दिवसांमध्ये भेटले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यासारख्या अती महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश आहे.


काश्मीर फाईल्स नाही तर झुंड, पावनखिंडही टॅक्स फ्री करा : रा. स्व संघाची मागणी
भाजपचा भगवा भेसळयुक्त ; शिमग्याचा खरा अर्थ समजून घ्या, फडणवीसांना टोला

विवेक अग्निहोत्रीनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सरसंघचालक मोहन भागवत यांनीही तोंडभरुन कौतुक केलं आहे. पंतप्रधानांनी तर या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोलही सुनावले आहेत. भाजपाची सत्ता असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्सी फ्री करण्यात आला आहे. त्याचवेळी काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटावरुन बराच वाद सुरु आहे. एकीकडून या चित्रपटाला पाठिंबा मिळत असला तरी दुसरीकडे या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. त्यामुळेच ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com