Pune By-poll Election : कसब्याची मोजणी होणार 20 फेऱ्यांमध्ये; आधी 'या' भागातील मतमोजणी होणार

Election Commission : मतमोजणीसाठी १६ टेबल; सर्व तयारी पूर्ण
Election Commission
Election CommissionSarkarnama

Kasba By-Election : कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) मतदान झाले. येथे भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत झाली. कसब्याच्या पश्चिम भाग रासने तर पूर्व भाग हा धंगेकरांसाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे उद्या होणारी मतमोजणी नेमकी कुठल्या भागातून सुरू होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

या निवडणुकीची मतमोजणी उद्या (ता. २ मार्च) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना आज (ता. १ मार्च) प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते उपस्थित होते.

आज झालेल्या प्रशिक्षण वर्गात किसवे- देवकाते यांनी कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. इव्हीएमवरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी व नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा इव्हीएम सील करणे, साहित्य पुरवठा आदीबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) यासह भारत निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करण्याबाबत सूचना केल्या आहेत.

Election Commission
Kasba By Election : निकालाआधीच कसब्यात धंगेकर समर्थकांनी भाजपला डिवचलं; 'ही' कविता सोशल मीडियावर व्हायरल

किसवे-देवकाते यांनी सांगितले की, उद्या सकाळी आठ वाजता कसब्यातील मतमोजणी सुरू होणार आहे. भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. त्यासाठी १६ टेबल तयार केले आहेत. त्यातील १४ टेबल ईव्हीएम मतमोजणीसाठी असतील. तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि इटीपीबीएससाठी प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे.

सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे ५० अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आल्याचेही किसवे-देवकाते आणि भंडारी यांनी माहिती दिली.

Election Commission
Maharashtra Politics : राऊतांचे टेन्शन वाढले?; हक्कभंग समितीत राहुल कुलांसह राणेंचा समावेश

दरम्यान, Kasba कसबा आणि चिंचवड chinchwad पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या उद्या लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल हा येथील पूर्व आणि पश्चिम भागात झालेल्या मतदानावर अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे उद्याची मतमोजणीची सुरुवात कुठल्या भागातून होणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही मतमोजणी कुठल्याही मतदान केंद्राच्या क्रमानुसार किंवा भागानुसार होणार नाही. यामुळे कुणाला कुठल्या भागातून मताधिक्य मिळेल, याचा अंदाज लावणे अवघड जाणार आहे.

Election Commission
Kishori Pednekar : ठाकरेंसोबत म्हणून आमचा छळ, पण आम्ही कफन बांधून उतरलोय..

Election Commission यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी किसवे-देवकाते सांगितले की, ही मतमोजणी कुठल्याही मतदान केंद्राच्या क्रमानुसार किंवा भागानुसार होणार नाही. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची उद्घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करणार आहेत. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रँडम पद्धतीने पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे. कंट्रोल युनिटवरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट स्लिप्सची पडताळणी केली जाणार आहे.

दरम्यान, मतमोजणीसाठी सर्व व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे. मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, पोलीस समन्वय कक्ष, निवडणूक उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासाठी कक्ष तयार केले आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था गाडगे महाराज विद्यालय कोरेगाव पार्क येथील मैदानावर असणार आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी किसवे-देवकाते यांनी माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in