Pune By-Election 2023 : कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीची तारीख बदलली ;या दिवशी होणार निवडणूक

Kasba Chinchwad Constituency Election Date : ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे.
Kasba Peth Chinchwad assembly by election news update
Kasba Peth Chinchwad assembly by election news updatesarkarnama

Pune News : कसबा पेठ (Kasba Peth)आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक (Chinchwad assembly by election) मतदानाच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. ही निवडणूक 27 फेब्रुवारीला होणार होती. ती आता २६ फेब्रुवारीला होणार आहे. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा हा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता.

या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत, त्यामुळे या निवडणुकीची तारीख बदलावी, असे आहवलात नमूद केले होते. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला आहे.

Kasba Peth Chinchwad assembly by election news update
Santosh Bangar News : शिंदे गटातील आमदाराचा 'नवा पराक्रम' ; Video व्हायरल ; प्राध्यापिकेला..

त्यानुसार ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मतमोजणी २ मार्च रोजी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

ईव्हीएम यंत्रांची पहिल्या टप्प्यात तांत्रिक तपासणी करण्याचे काम सुरू आहे. या तपासणीमध्ये यंत्रे व्यवस्थित चालू आहेत की नाही, याची तपासणी करण्यात येत आहे. उमेदवार यादी अंतिम झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व राजकीय प्रतिनिधींसमवेत अशीच तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

  • कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात २७० मतदान केंद्र आहेत.

  • चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५१० मतदान केंद्र आहेत.

  • या मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशिन (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपॅट यंत्रे असणार आहे.

  • या दोन्ही मतदारसंघांत मिळून एकूण ७८० मतदान केंद्र आहेत.

  • एकूण १७२० ईव्हीएम यंत्रे जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com