Who is Dhangekar? असे विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना दाखवून दिलं.. Dhangekar is now...."

Who is Dhangekar? Viral Poem : "आता कळलं का Who is धंगेकर.." ,
Ravindra Dhangekar - Chandrakant Patil
Ravindra Dhangekar - Chandrakant PatilSarkarnama

Kasba Peth By Election Result : कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना धूळ चारत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी झाले आहेत.

या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. 'कसबा' मिळविण्यासाठी प्रचारात भाजप, महाविकास आघाडीने नेत्यांची फौज उतरवली होती. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी कसब्यात प्रचार करुन निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

निवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. "हू इज धंगेकर? कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी है" अशा मजकुराचे बॅनर्स लावण्यात आले होते. हू इज धंगेकर? (Who is Dhangekar?) असा सवाल भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा पोटनिवडणुकीचा प्रचारादरम्यान भरसभेत विचारला होता.

Ravindra Dhangekar - Chandrakant Patil
Kasba Peth Bypoll Election Result : धंगेकरांनी ज्योतिषाचे भाकीत खोटं ठरवलं..

त्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून शहरात पोस्टरबाजी करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत. मुळे कसबा तो झाकी है, कोथरूड अभी बाकी आहे म्हणत पाटील यांना डिवचण्यात आले आहे.

मतदानानंतर दोन दिवसापासून सोशल मीडियावर 'Who is Dhangekar'ची चर्चा आहे. याबाबत कविता, मीम्स व्हायरल होत आहे. कालपासून (बुधवारी) अशीच एक कविता 'Who is Dhangekar'ही कविता व्हायरल होत आहे. या माध्यमातून धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपला डिवचलं होते. धंगेकरांच्या विजयानंतर आज (गुरुवार)

Ravindra Dhangekar - Chandrakant Patil
Kasba Peth Bypoll Election Result : निकालापूर्वीच धंगेकरांना अजितदादा, पटोलेंचा फोन ; कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण..

"हू इज धंगेकर? (Who is Dhangekar) ट्रेड होत आहे. "Who is Dhangekar...? Dhangekar is now MLA" असा मजकूर सध्या सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. तर "आता कळलं का Who is धंगेकर.." , "फक्त घाम नाही, बालेकिल्ला फोडलाय," असे म्हणत अप्रत्यक्षपणे चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

समाज माध्यमावर व्हायरल झालेली कविता..

Who is dhangekar?

ज्याने पाडला गणेश बिडकर,

केला गड सर,

Who is dhangekar?

ज्याने वाटायला लावले,

चांदीच्या विटा, सोन्याचे डॉलर,

Who is dhangekar?

प्रचाराला लावले RSS चे केडर,

भले-भले मोठे बिल्डर,

Who is dhangekar?

देशाचे नेते फिरवले गल्लीभर,

धास्तीने जागेच रात्रभर,

Who is dhangekar?

ज्याने अश्रू आणले ओठांवर,

बंगल्याचे ओझे पेठांवर,

Who is dhangekar?

ज्याने आठवायला लावले पुण्येश्वर,

नदीत उतरून पहाय लावले ओंकारेश्वर,

Who is dhangekar?

जबरदस्तीने पैसे वाटतो हरिहर,

नाकारता हात उचलतो आया-बहिणींवर,

Who is dhangekar?

घाम फुटलाय ज्याच्या धाकावर,

ज्याने खोबऱ्याचे तेल आणलय कपाळावर, नाकावर.

कळले का❓

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com