Pune By Election Result : कसब्यात 11 हजार ४० मतांनी धंगेकर विजयी

Kasba Chinchwad By-Election Result 2023 Live : कसब्याच्या निकाल दुपारपर्यंत लागणार..
Kasba Chinchwad By-Election Result 2023 Live
Kasba Chinchwad By-Election Result 2023 Live

Kasba Chinchwad By-Election Result 2023 Live : कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज (गुरुवार) मतमोजणी आहे. मतमोजणी प्रारंभ झाला आहे.

चिंचवड येथे विठ्ठल काटे (NCP), भाजपच्या अश्विनी जगताप (bjp) आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासणे रिंगणात आहेत.

पोस्टल मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. कसबा पेठेत रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत.

चिंचवडमध्ये पोस्टल मतदानात ४०५३ मते मिळाली आहे. तर राहुल कलाटे १२७३, नाना काटे यांना ३ हजार ६०५ मते मिळाली आहेत. धंगेकर अडीच हजार मतांनी आघाडीवर आहे.

धंगेकरांनी तीन हजारी आघाडी घेतली आहे. रासनेंनी २ हजार ८०० मते हे पहिल्या फेरीत मिळाली आहे, अश्विनी जगताप यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतली आहे.

Abhijit Bichukale
Abhijit Bichukale Sarkarnama

अभिजीत बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाली आहेत. कसब्यात सहाव्या फेरीत धंगेकर साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत, तर चिंचवडमध्ये जगताप यांनी पाचव्या फेरी अखेर अडीच हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक सहावी फेरी मधील मते रवींद्र धंगेकर - ४२७० हेमंत रासने - २८२४ लीड धंगेकर- १४४६

आठवी फेरी- रवींद्र धंगेकर 30527 मतांनी आघाडीवर आहेत. हेमंत रासने यांना 27187 मते मिळाली आहेत. तर, चिचंवडमध्ये अश्विनी जगताप यांनी 4 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे.

कसबा मतदारसंघात 13व्या फेरीअखेर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केवळ 123 मते मिळाली आहेत.तर अपक्ष उमेदवार अभिजित बिचकुले यांना केवळ ४ मते मिळाले आहेत. पुणेकरांनी या दोघांना नाकारलं आहे.

आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर १८ व्या फेरी अखेर ९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. निकालापूर्वीच धंगेकरांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरवात केली आहे. कसबा पेठेत धंगेकरांचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत आहेत .

कसब्यात 11 हजार ४० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मते मिळाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com