Kasba By-Poll Electon : शेवटचे काही मिनिटे शिल्लक असताना मोठी गर्दी : मतदान न करताच काही जण परतले!

Kasba By-Poll Electon : मतदानाची वेळ संपल्यावर मतदारांची एकच झुंबड
Kasba By-Poll Electon
Kasba By-Poll Electon Sarkarnama

Kasba By-Poll Electon : मतदानाची वेळ संपल्यानंतर कसब्यातील विनोबा भावे शाळेमध्ये मतदानासाठी गर्दी झाली आहे. गंज पेठ इथल्या मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपून गेल्यावर मतदारांची लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. सकाळपासून मात्र याच मतदान केंद्रावर शुकशुकाट पाहायला मिळायला होता. पण, जसजसा मतदानाचा वेळ संपत आला, मतदारांच्या रांगांची लांबी देखील वाढताना दिसत आहेत.

गंज पेठ येथील मतदान केंद्रावर ऐनवेळी मतदार बाहेर पडले. मतदानासाठी शेवटचे काही तास शिल्लक असताना, येथे मोठी रांग पाहायला मिळाली. मात्र सहा वाजता मतदान थांबणार यामुळे पोलिस व निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदारांना केंद्रापर्यंत पोहचवण्याची घाई केली. रांगा लागलेल्या लोकांपैकी अनेकांना मतदानाचा अधिकार बजावणयासाठी तातडीने मतदान केंद्रापर्यंत पोहचवले.

Kasba By-Poll Electon
Aimim News : एमआयएमचा समान नागरी, लव्ह जिहाद कायद्यासह हिंदू राष्ट्राला विरोध..

मतदार उशीरा पोहचल्यामुळे अनेकांना मतदान करता आले नाही. रांगेतून अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले. यामुळे काही मतदारांची निराशा झाली. यामुळे काही अंशी मतदानाच्या टक्क्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com