Kasba Peth Election Result : बापट-टिळकांच्या पाठीशी असलेले मतदार हेमंत रासनेंच्या मागे का उभे राहिले नाही?

Kasba By-Election : पेठांमधून भाजपची मते घटली..
Kasba By-Election : Girish Bapat : Kasba Peth Election Result :Hemant Rasne : Mukta Tilak
Kasba By-Election : Girish Bapat : Kasba Peth Election Result :Hemant Rasne : Mukta Tilak Sarkarnama

Kasba By-Election : भाजपचा गड मानला जाणारा कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemnat Rasne) यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ११ हजार ४० मतांच्या चांगल्या मताधिक्याने विजय खेचून आणला.

कसबा मतदारसंघात १९९५ पासून सातत्याने भाजपने वर्चस्व राखले होते. पुण्याचे खासदार गिरीश बापटांनी (Girish Bapat) या मतदारसंघाचं नेतृत्व केले. बापट सलगपणे पाच वेळा या मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ ला बापट पुण्याच्या लोकसभा मतदारसंघावर निवडून गेल्यानंतर पुण्यात अनेक वर्ष नगरसेवक राहिलेल्या व पुण्याचं महापौरपद भूषवलेलल्या दिवंगत मुक्ता टिळक (Mukta Tilak) या बापटांनंतर या मतदारसंघातून निवडून आल्या. यावेळी त्यांना त्यांच्या पारंपारिक मतदारांनी एकगठ्ठा मतदान केले.

बापट असो वा टिळक यांच्या पाठीशी नेहमीच त्यांच्या पाठीशी पारंपारिक मतदार उभे राहताना दिसले. मात्र आताच्या कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने यांच्या पाठीशी मात्र भाजपचे पारंपारिक मतदार तितक्या ठामपणे उभे राहिलेले दिसत नाहीत. यामुळे पारंपारिक मतदारांची नाराजी होती, हे मतदानाच्या चित्रावरून स्पष्ट होते.

Kasba By-Election : Girish Bapat : Kasba Peth Election Result :Hemant Rasne : Mukta Tilak
Ravindra Dhangekar : भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणाऱ्या धंगेकरांचं टिळक कुटुंबियांनी केलं अभिनंदन!

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्यानंतर कसबा पेठ पोटनिवडणुकीत उमेदवारी टिळक कुंटुंबातच मिळणार अशी सुरूवातीपासून चर्चा होती. मात्र राजकीय गणितं, सामाजिक समीकरण आणि प्रतिस्पर्धी उमेदवार यांचा धांडोळा घेता भाजपने ओबीसी चेहऱ्याला उमेदवारी देत, हेमंत रासनेंना मैदानात उतरवले. भाजपच्या या निर्णयामुळे सुरूवातीला टिळक कुटुंबाची नाराजी असल्याची चर्चा झाली.

मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांनी माध्यमांसमोर उघड नाराजी ही व्यक्त केली. यानंतर मतदारसंघातील ब्राह्मण समाज नाराज असल्याचे निनावी फलक लावले गेले. यामुळे ब्राह्मण समाज भाजपवर नाराज असून, या नाराजीचा परिणाम मतदानावर उमटणार, अशा प्रतिक्रिया येत होत्या.

भाजपने उमेदवारीत टिळक कुटुंबाला तर डावललेच, पण ब्राह्मण समाजाचा चेहरा ही दिला नाही. यामुळे परंपरागत भाजपसोबत असलेला मतदार नाराज होऊन, पारंपरिक मतदार मतदानासाठी एकगठ्ठापणे घरातून बाहेर पडला नाही, अशी चर्चा आहे. मतदारसंघात ब्राह्मण उमेदवाराचा चेहरा नसल्यामुळे भाजपच्या पारंपारिक मतदारांमध्ये मतदानासाठी निरूत्साह दिसून आल्याचे बोलले जाते. याचाच फटका भाजपला बसला आहे.

पेठ भागात भाजपचे मताधिक्य घटले..

कसबा पेठेत भाजपचे वर्चस्व असताना प्रभाग क्रमांक 15 मध्ये सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठेत भाजपचे मताधिक्य काही अंशी घटल्याची चर्चा आहे. या भागातील निर्णायक मते धंगेकरांच्या पारड्यात पडलेली आहेत. तर काही मते भाजपपसून दुरावली आहेत.

या भागाने भाजप आणि भाजप उमेदवाराला नेहमीच साथ दिली. बापट आणि टिळकांना या भागाने नेहमीच मताधिक्य मिळवून दिले. मात्र यंदा धंगेकरांनी भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत, निर्णायक मते आपल्याकडे खेचली आहेत.

कसब्यात 2019 विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार प्रभाग क्रमांक 15 मध्ये 41 हजार 777 जणांनी मतदान केले होते. यापैकी 68टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली होती. या भागातून एकट्या भाजपला तब्बल 21 हजार 29 मतांचे मताधिक्य प्राप्त झाले होते. आताच्या पोटनिवडणुकीत येथून 51 टक्के मतदान झाले. मागच्या वेळेच्या तुलनेत 4 हजार 540 मतदारांनी मतदानात निरूत्साह दाखवत, मतदाने केले नाही.

लोकमान्यनगर, नवी पेठ या भागातूनही भागात मागील विधानसभा निवडणुकीत 22 हजार 109 मतदारांनी मतदानाचा बजावला. पण आताच्या निवडणुकीत 19 हजार 120 जणांचे मतदान झाले आहे. यामुळे 2 हजार 989 जणांचे मतदान कमी झाले. याचाच फटका रासनेंना बसला व धंगेकरांनी निर्णायक विजयी आघाडी घेतली.

Kasba By-Election : Girish Bapat : Kasba Peth Election Result :Hemant Rasne : Mukta Tilak
Pune By Poll Election : चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाला बंडखोर उमेदवारामुळे 'कलाट'णी

महाविकास आघाडीचा पहिलाच प्रयोग :

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची युती व आघाडी संपुष्टात येऊन, सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. यामुळे मतांची विभागणी होऊन भाजपचा विजय सुकर झाला होता. मात्र यंदा महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढवली. महाविकास आघाडीचा मतदारसंघासाठी हा पहिलाच राजकीय प्रयोग होता. तिन्ही पक्षांची ताकदीने, मिळून भाजपचा पराभव घडून आला. महाविकास आघाडीच्या एकजुटीने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय साकारला गेला.

रवींद्र धंगेकर माणसात मिसळणारा माणूस :

रवींद्र धंगेकर हा जनमाणसात मिसळणारा कार्यकर्ता असल्याची त्यांची प्रतिमा आहे. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. यामुळे सामान्य मतदारांना नेहमी उपलब्ध होत असतता. यामुळे मतदारांना धंगेकर आश्वासक चेहरा वाटल्याने, मतदारांची पसंती धंगेकरांना मिळाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in