Kasba By-Election : धंगेकरांच्या अभिनंदनाचे होर्डिंग लागले आणि दोन तासात पुन्हा काढलेसुद्धा !

Kasba Hoardings News : कार्यकर्त्यांचा अतिउत्साहीपणा, एकच चर्चा..
Kasba by-Election : Ravindra Dhangekar
Kasba by-Election : Ravindra DhangekarSarkarnama

Ravindra Dhangekar : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले. महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात ही मुख्य लढत आहे. मतदानानंतर आता निकाल २ मार्च रोजी जाहीर होणार आहेत. मात्र निकालाआधीच विजयाचे दावे करण्यात येत आहेत. रवींद्र धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याच्या आशयाचे होर्डींग्स पुण्यात लावण्यात आलेले दिसले. मात्र याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन तासातच हे फलक हटवण्यात आले.

Kasba by-Election : Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar News: 'कसब्यात मुख्यमंत्री शिंदे पैसे वाटत फिरत होते' ; धंगेकरांचे खळबळ उडवून देणारे आरोप!

पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच पुण्यात आमदार म्हणून रवींद्र धंगेकर यांचे होर्डिंग्स लागल्याने, उत्साही कार्यकर्त्यांचा उतावळेपणा दिसून आहे. 'आमदारपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र भाऊ धंगेकर यांचे हार्दिक अभिनंदन,' असा उल्लेख या होर्डिंगवर आहे. यामुळे निकालाआधीच धंगेकर हे विजयी झाले का? अशी चर्चा सोशल मीडीयावर दिसून येत होती. मात्र कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहपणाला आवर घालत आता हे होर्डिंग्स हटवण्यात आले.

Kasba by-Election : Ravindra Dhangekar
Budget : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा मोठा डाव : विधानपरिषद शिवसेनेवर ताबा मिळवण्याच्या हालचाली!

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत रविवारी मतदान पार पडले. २ मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल येणार आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडून आले. भाजप व महाविकास आघाडीच्या नेते आपापले पक्ष आणि उमेदवारासाठी जोरदार प्रचार केला. लढत अतिशय चुरशीची असल्यामुळे निकालाआधीच विजयाचा दावा करणे कठीण असताना, होर्डिंग्जबाजी सुरू झाल्याने, चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com